जबरदस्त ! महाराष्ट्रातील ‘ह्या’ मच्छिमाराला मिळाले ‘हे’ खास मासे; किंमत आहे करोडोमधे , वाचून व्हाल हैराण

MHLive24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-  मासेमारी करताना खजिना सापडल्याच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील. आता प्रत्यक्षातही असेच काहीसे घडले आहे. पालघर, महाराष्ट्रातील एका मच्छीमारला काही खास मासे सापडले आहेत. या मच्छीमाराचे नाव चंद्रकांत तरे आहे. त्यांना असे मासे सापडले आहेत, ज्यांची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. तरे यांना 157 घोल मासे सापडले आहेत. त्यांची किंमत 1.33 कोटी रुपये आहे. ( Fisherman from Maharashtra got this special fish )

चंद्रकांत तरे त्यांच्या मालकीची हरबा देवी बोट घेऊन मासेमारीसाठी काही हौशी तरूणांना घेऊन समुद्रात मच्छीमार बांधवांना घेऊन गेले होते. तरे यांनी मासेमारी करण्याकरिता वागरा पद्धतीचे जाळे समुद्रात सोडले. थोड्यावेळाने त्यांना ते जड लागले. त्यांनी जाळे वर खेचल्यानंतर त्यामध्ये दीडशे पेक्षा जास्त मासे सापडले.

घोळ मासा हा अंदाजे 18-25 किलो वजनाचे असतात, एका माशामध्ये 300-400 ग्राम वजनाची पिशवी (बोत) मिळण्याचा अंदाज आहे. दरम्यान लिलावात 1 कोटी 26 लाख रुपयांची बोत आणि मासे मिळून दीड कोटीहून अधिक रक्कम मच्छिमार चंद्रकांत तरे यांनी मिळवली.

Advertisement

घोळ माशांच्या पोटातील पिशवीला (बोत) विशेष महत्त्व आहे. त्यामुळे हे दुर्मीळ मासे लाखे रुपयांना विकले जातात. यांच्या किंमतीची बोली लागते. त्याचा वापर वैद्यकीय उपचारासाठी देखील केला जातो असंही सांगितलं जातं.

जाळ्यात सापडलेल्या माशांचं वजन साधारण 18 ते 25 किलो असावं असं सांगितलं जात आहे. हा मासा सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, हाँगकांग अशा देशांमध्ये पाठवला जातो. घोळ जातीच्या सर्वात लहान माशाची किंमत 8 ते 10 हजार रुपये आहे.

काय आहे या माशात खास ? :- घोळ मासा स्वादिष्ट असून, त्यात अनेक औषधी गुणधर्म असल्याने या माशाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे माशाला एवढी किंमत मिळते. जुलै-सप्टेंबरदरम्यान हा मासा समुद्रकिनार्‍यालगत येतो.

Advertisement

या माशाचे जठर व फुफ्फुस आदी अवयवांद्वारे शल्यचिकित्सेला लागणारे धागे (टाके) बनविले जातात. माशातील कोलेजनचा वापर अनेक औषधांमध्ये केला जातो. त्यामुळेच घोळ माशाला आशिया खंडाच्या पूर्व भागात मोठी मागणी आहे. याच कारणाने घोळ माशाला ‘सोने के दिलवाली मछली’ म्हणून ओळखले जाते.

हा मासा साधारणपणे सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, हाँगकाँग आदी ठिकाणी निर्यात केला जातो. या जातीच्या सर्वात लहान माशाची किंमतही 8 ते 10 हजार रुपये असते. या माशाचे शास्त्रीय नाव प्रोटोनिबिया डायकँथस असे आहे. घोळ मासा आणि त्याची पिले कच्छच्या आखातापासून ते मुंबईपर्यंत असलेल्या समुद्रात सापडतात. घोळ माशाचे कोळंबी हे मुख्य अन्न आहे.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker