Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

‘तू जिथे असशील तिथे संपवून टाकू’; मनसे उमेदवाराला मिळाली धमकी

Mhlive24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :- पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीच्या प्रचारात सर्वच उमेदवार गुंतले आहेत. अशात शनिवारी खळबळ उडवून देणारी पुण्यात घटना घडली.

Advertisement

पुणे. मनसेच्या पुणे पदवीधर उमेदवार रूपाली पाटील यांना फोनकरून जीवे मारण्याची धमकी दिल्याने निवडणुकीपूर्वीच एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement

दरम्यान पाटील यांना शनिवारी त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात नंबरवरून फोन आला. ‘मी सातारा जिल्ह्यातून लबाडे बोलत असून, आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस.

Advertisement

अन्यथा पुण्यात जिथे असशील तिथे संपवून टाकू.’ अशी धमकी दिली. याप्रकरणी तपास करून धमकी देणाऱ्याला अटक करण्याची मागणी पाटील यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे.

Advertisement

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी राज्यात निवडणूक होत आहे.

Advertisement

सर्वच मतदारसंघात प्रचार रंगू लागला आहे. भाजपकडून संग्रामसिंह देशमुख, महाविकास आघाडीकडून अरुण लाड,

Advertisement

तर मनसेकडून माजी नगरसेविका रूपाली पाटील यांच्यासह अनेक जण या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Advertisement

प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच जीवे मारण्याची धमकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना देण्यात आली आहे.

Advertisement

याप्रकरणी तपास करून धमकी देणाऱ्याला अटक करण्याची मागणी पाटील यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे. यासंदर्भात एक तक्रार अर्ज त्यांनी खडक पोलिस ठाण्यात दिला आहे.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement
li