PM Kisan: आता किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहा हजारांबरोबरच 5000 रुपये मासिक पेन्शन देखील मिळेल; ‘असा’ घ्यावा लागेल लाभ

MHLive24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारच्या सर्वात महत्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. या योजनेमध्ये, 2,000 रुपयांचे तीन हप्ते म्हणजे 6000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पेन्शनची सुविधा पीएम किसान मानधन योजनेच्या स्वरूपातही आहे.( PM Kisan)

जर तुम्ही पीएम किसानमध्ये खातेदार असाल, तर तुम्हाला याचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही दस्तऐवजाची आवश्यकता नाही.

तुमची थेट नोंदणी पीएम किसान मानधन योजनेमध्ये देखील केली जाईल. या योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे जाणून घेऊया.

Advertisement

पीएम किसान मानधन योजना काय आहे ?

पीएम किसान मानधन योजनेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत 60 वर्षानंतर पेन्शनची तरतूद आहे. 18 ते 40 वर्षे वयाचा कोणताही शेतकरी या योजनेत गुंतवणूक करू शकतो. या अंतर्गत शेतकऱ्याला 5000 रुपयांपर्यंत मासिक पेन्शन मिळते.

ग्यारंटेड पेन्शन मिळेल

Advertisement

या योजनेत, नोंदणीकृत शेतकऱ्याला वयानुसार मासिक गुंतवणुकीवर वयाच्या 60 वर्षांनंतर किमान 3000 रुपये किंवा 36,000 रुपये वार्षिक पेन्शन मिळेल. यासाठी मासिक गुंतवणूक 55 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत करता येते. पीएम किसान मानधन मध्ये कौटुंबिक पेन्शनची तरतूद आहे. खातेदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या जोडीदाराला 50 टक्के पेन्शन मिळेल. कौटुंबिक पेन्शनमध्ये फक्त जोडीदाराचा समावेश आहे.

पीएम किसान लाभार्थीला कसा फायदा होईल?

पीएम किसान योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना सरकार दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत 2000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये देते. ही रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात सोडली जाते. जर त्याचे खातेदार पीएम किसान मानधन पेन्शन योजनेत सहभागी झाले तर त्यांची नोंदणी सहज होईल.

Advertisement

तसेच, जर शेतकऱ्याने हा पर्याय निवडला, तर पेन्शन योजनेमध्ये भरावे लागणारे पैसे देखील याच योजनेतून कपात केले जातील. म्हणजेच, यासाठी पीएम किसान खातेदाराला खिशातून पैसे गुंतवावे लागणार नाहीत.

किती पैसे गुंतवावे लागतील?

पीएम किसान मानधन पेन्शन योजनेमध्ये तुम्हाला दरमहा किमान 55 आणि जास्तीत जास्त 200 रुपये गुंतवावे लागतील. या संदर्भात, एका वर्षात, तुम्हाला जास्तीत जास्त 2400 रुपये आणि किमान 660 रुपये भरावे लागतील.

Advertisement

जरी 6 हजार रुपयांमधून जास्तीत जास्त 2400 रुपयांचे योगदान कापले गेले, तरी सन्मान निधीचे 3600 रुपये तुमच्या खात्यात शिल्लक राहतील. आणि नंतर वयाच्या 60 व्या वर्षी तुम्हाला दरमहा 3 हजार पेन्शनचा लाभ मिळू लागेल. यासह, 2000 चे 3 हप्ते देखील दरवर्षी येत राहतील.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker