Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

शेतकऱ्यांना 75% अनुदानावर मिळेल सोलर पंप; ‘ह्या’ सरकारचा मोठा निर्णय

0 2

MHLive24 टीम, 17 जून 2021 :- ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी सोलर वॉटर पंपिंग सिस्टमसाठी अर्ज केला आहे, त्यांना हरियाणा सरकारच्या नवीन आणि नूतनीकरणयोग्य उर्जा विभागाकडून 3 एचपी ते 10 एचपी सौरऊर्जा पंपांवर 75 % पर्यंत सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सौर उर्जा पंपावर 75% अनुदान :- मीडिया रिपोर्टनुसार एडीसी जगनिवास म्हणाले की नवीन आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जा विभागद्वारा 3 एचपी, 5 एचपी, 7.5 एचपी व 10 एचपीच्या सौर उर्जा पंपवर 75% सब्सिडी देईल.

Advertisement

तथापि, हे सौर उर्जा पंप केवळ अशाच शेतकऱ्यांना दिले जातील जे ठिबक सिंचन / स्प्रिंकलर सिंचन योजनेसारख्या सूक्ष्म सिंचनाखाली सिंचन करतात आणि पाईपलाईन जमिनीखाली गाडून आपल्या शेतात सिंचन करतात आणि ज्यांनी यापूर्वी ही प्रणाली मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. .

सौर उर्जा पंपावर कोणाला अनुदान मिळणार? :- ज्या शेतकऱ्यांना पूर्वी अनुदानावर सौर पंप देण्यात आले आहेत त्यांना या योजनेअंतर्गत पात्रता नाही, तर एका शेतकऱ्याला एकच सौर पंप देण्यात येईल. हे उल्लेखनीय आहे की निवडलेल्या शेतकऱ्यांना कंपनीला वर्क ऑर्डर मिळाल्यापासून 4 महिन्यांत सौर उर्जा पंप देण्यात येईल. परंतु, या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला 25% रक्कम जमा करावी लागेल.

Advertisement

त्याशिवाय एडीसी जगनिवास यांनी असे म्हटले आहे की ज्या शेतकऱ्यांनी सौर पंपवर अनुदान मिळण्यासाठी पूर्वी अर्ज केला असेल आणि सौर वॉटर पंपिंग सिस्टम बसवायची असतील तर लाभार्थी डिमांड ड्राफ्ट एडीसी कम सीपीओ आइडी झज्जर नावे बनवून अतिरिक्त उपायुक्त कार्यालयात सादर करू शकता.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement