Best budget scooters : 65 हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या ‘ह्या’ आहेत शानदार 4 स्कूटर; एक थेंबही पेट्रोल पीत नाही

MHLive24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी लोकांच्या खिशाला फटका बसू लागला असून आता सामान्य इंजिनवर चालणाऱ्या दुचाकींऐवजी इलेक्ट्रिक दुचाकींना लोक पसंत करू लागले आहेत. ही इलेक्ट्रिक वाहने बॅटरीवर चालतात आणि पेट्रोलचा एक थेंबही पीत नाहीत.(Best budget scooters)

परंतु इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या किमती थोड्या जास्त आहेत, विशेषत: Vespa इलेक्ट्रिक, Ola S1 आणि S1 Pro, Ather Energy आणि इतर अनेक ब्रँडसाठी जास्त आहे.

जर तुम्हाला इंधनावर दररोज खर्च होणारी रक्कम वाचवायची असेल आणि इलेक्ट्रिक टू-व्हीलर देखील तुम्हाला 65,000-66,000 रुपयांपर्यंतच खरेदी करायचे असेल तर या बातमीत आम्ही तुम्हाला अशा 4 स्कूटर्सबद्दल सांगत आहोत.

Advertisement

हीरो ऑप्टिमा HX

Hero Electric 60,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत ड्युअल बॅटरीसह Optima HX इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत आहे. दिल्लीत त्याची एक्स-शोरूम किंमत 58,980 रुपये आहे. कंपनी अगदी कमी किमतीच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री करत आहे, पण Optima HX दिसायला खूप मजबूत आहे.

स्कूटर 30Ah बॅटरी आणि 1200W मोटरने सुसज्ज आहे जी तिला 42 किमी/ताशी कमाल वेग देते. हिरोचा दावा आहे की ही स्कूटर 1 चार्जमध्ये 122 किमी पर्यंत चालते.

Advertisement

स्कूटरची बॅटरी चार्ज होण्यासाठी 5 तास लागतात. स्कूटरमध्ये 12-इंच अलॉय व्हील आणि एलईडी हेडलॅम्प, यूएसबी चार्जिंग पोर्ट, रीजनरेटिव्ह ब्रेकिंग आणि अँटी थेफ्ट अलार्म यासारख्या फीचर्स सह येते.

ओकिनावा लाइट

ओकिनावा भारतातील इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये अनेक स्कूटर्ससह उपस्थित आहे आणि कंपनी त्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये अतिशय कमी किमतीत विकत आहे. Okinawa Light बद्दल बोलायचे झाले तर, यात 250-वॉट BLDC मोटर देण्यात आली आहे, जी 1.25 kWh लिथियम-आयन बॅटरीने चालते, याशिवाय, कंपनीने EV ला स्टायलिश डिझाइनमध्ये सादर केले आहे.

Advertisement

63,990 रुपये किमतीत, त्यात एक रंगीत डिजिटल मीटर बसवण्यात आला आहे, जो स्पीड, रेन्ज आणि उरलेल्या चार्जिंगची माहिती देतो. येथे तुम्हाला LED DRL सह प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि फ्रंट व्हीलमध्ये डिस्क ब्रेक मिळतील.

या स्कूटरला पूर्ण चार्ज होण्यासाठी 4-5 तास लागतात, ज्याची रेंज 60 किमी आहे. यूएसबी पोर्ट आणि मोबाईल फोन चार्जर सारखी वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

Batt:RE LO:EV

Advertisement

LO:EV ही इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमधील आणखी एक परवडणारी स्कूटर आहे. इलेक्ट्रिक स्कूटरसोबत तीन राइडिंग मोड देण्यात आले आहेत, जे तिची रेंज वाढवण्यास खूप उपयुक्त आहेत. LO:EV मध्ये डिटेचेबल लिथियम-आयन बॅटरी आहे आणि ही EV दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेकसह येते.

स्कूटरची किंमत 65,900 रुपये आहे आणि रिव्हर्स गियर, अँटी-थेफ्ट अलार्म आणि यूएसबी चार्जरसह या किमतीच्या टप्प्यावर, ही विभागातील सर्वोत्तम पर्याय आहे. स्कूटरमध्ये 28Ah बॅटरी आहे जी 3 तासात पूर्ण चार्ज होते. एका चार्जवर ते 60 किमी पर्यंत चालवता येते.

अँपिअर मॅग्नस

Advertisement

Ampere Magnus ची किंमत 65,990 रुपये आहे आणि हा ब्रँड भारतात खूप पसंत केला जात आहे. कंपनीच्या टू-व्हीलर लाइन-अपमध्ये, आम्ही मॅग्नस त्याच्या किंमतीच्या आधारावर निवडला आहे. यासोबत, 28Ah लिथियम बॅटरी आणि 1200 वॅटची BLDC मोटर देण्यात आली आहे, जी इलेक्ट्रिक स्कूटरला 50 किमी/तास स्पीड देते.

एका चार्जवर EV सरासरी 84 किमी चालते. स्कूटरचा ग्रँड क्लीयरन्स 147 मिमी आहे आणि तिची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 6 तास लागतात. हे कोणत्याही सामान्य चार्जरने चार्ज केले जाऊ शकते आणि ही बॅटरी स्कूटरपासून वेगळी देखील होते.

अँपिअर मॅग्नसमध्ये एलईडी लाइट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि यूएसबी चार्जिंग पॉइंट सारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker