Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

विजय शिवतारे यांच्या कुटुंबातला काैटुंबिक कलह चव्हाट्यावर

0 5

MHLive24 टीम, 22 जून 2021 :- पुरंदरचे माजी आमदार आणि मंत्री विजय शिवतारे यांच्या कुटुंबातला कलह आता चव्हाट्यावर आला आहे. त्यांच्या मुलीने आई व भावांवर आरोप केल्यानंतर, पत्नीने शिवतारे यांचे दुसरे लग्न झाल्याचा बाँबगोळा टाकला आहे. आता ते आणखी एका महिलेसोबत राहत असल्याचा आरोप केला आहे.

२७ वर्षांपासून कुटुंबापासून अलिप्त :- शिवतारे यांच्या कन्येने आई-भावांवर आरोप केल्यानंतर शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. गेल्या 27 वर्षांपासून माझे पती विजय शिवतारे कुटुंबापासून अलिप्त असून पहिली पाच वर्षे एका महिलेसोबत लग्न करुन राहत होते.

Advertisement

त्यानंतर आजतागायत दुसऱ्या महिलेसोबत पवईला राहत आहेत, असा दावा मंदाकिनी यांनी मुलगा विनय शिवतारे यांच्या फेसबुक अकाऊण्टवरुन लाईव्ह येत केला आहे. त्यामुळे शिवतारे कुटुंबातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

पत्नीचा दावा काय ? :-  शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी यांनी मुलगा विनय शिवतारे यांच्या फेसबुक अकाऊण्टवरुन लाईव्ह येत लेकीचे आरोप फेटाळले. मुलगी ममता यांनी मुलगा विनय आणि विनस यांच्यावर केलेले आरोप धादांत खोटे आहेत. वास्तविक गेल्या 27 वर्षांपासून माझे पती विजय शिवतारे कुटुंबापासून अलिप्त राहत होते.

Advertisement

त्यातील पहिली पाच वर्षे उज्ज्वला बागवे नावाच्या महिलेसोबत लग्न करून राहत होते. त्यानंतर आता मीनाक्षी पटेल यांच्यासोबत पवईस राहत आहेत. संपत्ती हा वादाचा विषय नाही, शिवतारेंच्या मानसिक जाचातून सुटका करुन घेणे, हा माझा आणि माझ्या कुटुंबाचा एकमेव हेतू आहे, असा दावा मंदाकिनी यांनी केला आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement