Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

बँकेच्या नावाखाली येणारे बनावट कॉल करतात लुबाडणूक; ‘असा’ ओळखा बँकेच्या नावाने येणारा फ्रॉड कॉल

0 45

MHLive24 टीम, 15 जुलै 2021 :- कामासाठी इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे ऑनलाईन फसवणूकही वाढली आहे. कोणी आपला पासवर्ड चोरू शकतो आणि आपल्या खात्यातून पैसे काढू शकतो, तर कोणी फिशिंगद्वारे आपणास हानी पोहोचवू शकते. सेकंड हँड फोनच्या बहाण्याने आपली फसवणूक होऊ शकते, उच्च पगाराची ऑफर किंवा जॉब ऑफर करून आपली फसवणूक होऊ शकते.

ऑनलाईन बँकिंगमुळे आता बँकेच्या फसवणुकीचे नव-नवीन प्रकरण समोर येत आहेत . हे भामटे बँक अधिकारी म्हणून कॉल करतात आणि लोकांना त्यांच्या शब्दांत अडकवतात. अशा परिस्थितीत ग्राहकांना असे बनावट कॉल ओळखणे महत्वाचे आहे.

Advertisement

बनावट नंबर कसा ओळखावा ? :- बँक किंवा वित्तीय संस्थांच्या टोल फ्री क्रमांकासारखे नंबरवरून फसवणूक केली जात आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकताच या संदर्भात अलर्ट जारी केला आहे. आपल्याकडेही बनावट कॉल आल्यास तो ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे प्रथम क्रमांकाची पुष्टी करणे.

आपण बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन याची पुष्टी करू शकता. याशिवाय तुम्हाला एटीएम पिन, ओटीपी इत्यादी कॉलवर वैयक्तिक माहिती विचारली गेली तर कॉल बनावट आहे असे समजावे.

Advertisement

बँक माहिती मागवत नाही :- कोणतीही बँक किंवा त्याचे अधिकारी आपल्याला बँक खात्याचे वैयक्तिक तपशील विचारत नाहीत. तसेच, जर कॉलर आपल्याला एसएमएसद्वारे एक लिंक पाठवित असेल तर ते उघडणे टाळा. अशा बनावट लिंकद्वारे अनेकदा हे भामटे आपली फसवणूक करण्याचा कट रचतात.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement