Facilities on Ayushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डवर मिळणार अनेक सुविधा! ‘असा’ पद्धतीने घरबसल्या फटाफट करा डाउनलोड

MHLive24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- शासन सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवत असते. यातीलच एक म्हणजे आयुष्मान भारत योजना. सर्वसामान्यांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने आयुष्मान भारत कार्ड सुरू केले होते. यामध्ये प्रत्येक कार्डधारकाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा दिली जाते.(Facilities on Ayushman Bharat Card)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आयुष्मान कार्डच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या योजनेत दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने कार्ड देऊन फ्रॉड करणारे लोक या सुविधांचा लाभ घेत आहेत.

तुमचीही फसवणूक झाली असेल, तर तुम्ही त्याची त्वरित चौकशी करून तक्रार करा. तुमच्या नावावर उपलब्ध असलेल्या सुविधेचा कोणीही अनोळखी व्यक्ती फायदा घेत असेल तर लगेच आयुष्मान कार्डशी संबंधित तक्रार नोंदवा.

Advertisement

या क्रमांकावर तक्रार करा

तुमच्याकडूनbअशी चूक झाली असेल, तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता. अशा फसवणुकीसाठी सरकारने टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. तुमच्यासोबतही असे घडले असेल, तर तुम्ही १८००१८००४४४४ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता. तक्रार दाखल करण्यासाठी तुमच्याकडे कोणतेही प्रमाणित दस्तऐवज असणे आवश्यक आहे.

ऑनलाइन आयुष्मान भारत कार्ड डाउनलोड करा

Advertisement

तुम्हालाही आयुष्मान भारत कार्ड डाउनलोड करायचे असेल तर त्यासाठी https://pmjay.gov.in/ वर जा.
आता येथे लॉगिन करण्यासाठी तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाका.
आता एक नवीन पेज उघडेल, आता आधार क्रमांक टाकून पुढे जा. पुढील पृष्ठावर तुम्हाला तुमच्या अंगठ्याचे ठसे सत्यापित करावे लागतील.
आता ‘अप्रूव्ड बेनेफिशियरी” या पर्यायावर क्लिक करा.
आता तुम्हाला अप्रूव्ड गोल्डन कार्ड्सची यादी दिसेल.
या यादीमध्ये तुमचे नाव शोधा आणि कन्फर्म प्रिंट पर्यायावर क्लिक करा.
आता तुम्हाला CSC वॉलेट दिसेल, त्यात तुमचा पासवर्ड टाका.
आता येथे पिन टाका आणि होम पेजवर या.
उमेदवाराच्या नावावर कार्ड डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल.
येथून तुम्ही तुमचे आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकता.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker