अबब! फेसबुकला 500 कोटींपेक्षा जास्त दंड ठोठावला; कुणी ? का? वाचा…

MHLive24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- ब्रिटनने सोशल मीडिया वेबसाइट फेसबुकवर मोठा दंड ठोठावला आहे. माहितीचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रकरणात ब्रिटनने मार्क झुकरबर्ग यांच्या फेसबुकला हा दंड आकारल्याचे सांगितले जात आहे. ब्रिटनने सोशल मीडिया कंपनीला 500 कोटी रुपयांहून अधिक (5 कोटी डॉलर पेक्षा जास्त) दंड ठोठावला आहे.(Facebook was fined )

फेसबुकने जाणीवपूर्वक उल्लंघन केले: सीएमए

GIF प्लॅटफॉर्म Giphy खरेदी केल्यानंतर तपासादरम्यान नियामक आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल फेसबुकवर हा दंड लावण्यात आला आहे. स्पर्धा आणि बाजार प्राधिकरणाने (सीएमए) म्हटले आहे की, फेसबुकने हे जाणूनबुजून केले. त्यामुळे तो दंड लावणे आवश्यक झाले.

Advertisement

सीएमएने म्हटले की, कोणतीही कंपनी कायद्याच्या वर असू शकत नाही. नियामक म्हणतो की, फेसबुक जिफीच्या अधिग्रहणाबद्दल संपूर्ण माहिती देण्यात अपयशी ठरले. याखेरीज फेसबुकदेखील तपासादरम्यान जिफीला त्याच्या प्लॅटफॉर्मसह ऑपरेट करण्यात अपयशी ठरलेत.

नियामकाने अनेकदा दिला होता इशारा

नियामकाने म्हटले आहे की, फेसबुकने जिफीच्या अधिग्रहणाबद्दल आवश्यक माहिती दिली नाही. यासंदर्भात फेसबुकला नियामकाने अनेक वेळा इशाराही दिला होता. दरम्यान, रिपोर्टनुसार, फेसबुक आपल्या रि-ब्रँडिंगची तयारी करत आहे. फेसबुकच्या नवीन नावाची घोषणा पुढील आठवड्यात होऊ शकते.

Advertisement

फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग 28 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात कंपनीच्या नवीन नावाची घोषणा करू शकतात. फेसबुक अॅप व्यतिरिक्त, कंपनी इंस्टाग्राम , व्हॉट्सअॅप , ऑकुलससाठी नवीन नावे देखील जाहीर करू शकते. मात्र, फेसबुकने याबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker