Pan Aadhar Linking New Deadline : पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढली; ‘ही’आहे नवीन तारीख

MHLive24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- सरकारने पॅनला बायोमेट्रिक आयडी आधारशी जोडण्याची मुदत शुक्रवारी वाढवली. आता हे काम मार्च 2022 पर्यंत करता येईल. अशाप्रकारे, सरकारने पॅनला आधारशी जोडण्यासाठी आणखी सहा महिने दिले आहेत. ही मुदत या वर्षी 30 सप्टेंबरला संपणार होती.(Pan Aadhar Linking New Deadline)

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) एका निवेदनात म्हटले आहे की, कोविड -19 साथीमुळे लोकांना भेडसावत असलेल्या समस्या लक्षात घेऊन, मुदत वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे अनुपालन सुलभ होईल.

सीबीडीटीने म्हटले आहे की, “पॅनला आधारशी जोडण्यासाठी आयकर विभागाला आधार क्रमांक कळवण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.”

Advertisement

तसेच, आयकर कायद्यांतर्गत दंडाची कार्यवाही पूर्ण करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 पासून 31 मार्च 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

याशिवाय, बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंध अधिनियम, 1988 अन्वये न्यायनिर्णय प्राधिकरणाने नोटिसा बजावण्याची आणि आदेश पारित करण्याची अंतिम मुदतही मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker