Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

आयकर खात्याकडून ‘हे’ दोन फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ; सीबीडीटीचा मोठा निर्णय

0 2

MHLive24 टीम, 07 जुलै 2021 :- अधिकृत डीलर्ससाठी आयकर फॉर्म 15 सी आणि 15 सीबी सबमिट करण्यासाठी सरकारने मुदत वाढविली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) हा निर्णय घेतला आहे.

प्राप्तिकर अधिनियम 1961  नुसार हे दोन्ही फॉर्म इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरणे आवश्यक आहे. प्राप्तिकर पोर्टल www.incometax.gov.in वर आयकर फॉर्म 15 सीए / 15 सीबी इलेक्ट्रॉनिक दाखल करण्यात अडचणी लक्षात घेता सीबीडीटीने हा निर्णय घेतला आहे.

Advertisement

परदेशातून आलेल्या पैशांसाठी अधिकृत डिलरकडे एक प्रत द्यावी लागते. त्यापूर्वी करदात्यांना 15CA आणि 15CB हे फॉर्म ई-फायलिंग पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक असते. मात्र, सध्या Income Tax E-Filing पोर्टलमधील तांत्रिक अडचणींमुळे CBDT ने हे फॉर्म जमा करण्यासाठी मुदत वाढ दिली आहे.

त्यानुसार आता करदात्यांना 15 जुलैपर्यंत हे फॉर्म अधिकृत डीलर्सकडे सबमिट करता येतील. तर डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन नंबर  जनरेट करण्यासाठी ई पोर्टलवर दोन्ही फॉर्म जमा करण्याची सुविधा आणखी काही दिवसांनी सुरु होईल.

Advertisement

7 जूनला सुरु झाले होते पोर्टल :- www.incometax.gov.in हे पोर्टल 7 जूनपासून सुरु झाले होते. कर भरतानाची प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले होते. मात्र, या नव्या पोर्टलचा वापर करताना करदात्यांना अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले होते. या पोर्टलवरील अनेक सुविधा अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. त्याठिकाणी केवळ COMING SOON असा मेसेज दाखवला जात आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement