व्यवसाय करण्याचा सल्ला सर्वच देतात; परंतु व्यवसाय करण्याआधी आवश्यक असतात काही गोष्टी; जाणून घ्या त्याविषयी

MHLive24 टीम, 19 जुलै 2021 :-  आज प्रत्येकालाच स्वतःचा व्यवसाय असावा असे वाटते. कोरोनाने तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे अनेक लोकांना नोकरी पेक्षा स्वतःचा व्यवसाय हवा असे वाटते. उद्योग करणे सोपे नक्कीच नाही परंतु संपूर्ण तयारीनिशी उतरला नाहीत, तर नुकसान होण्याची संभावना जास्त असते. म्हणूनच पूर्वतयारी करणे हा यावर उत्तम पर्याय आहे.

कोणताही अनुभव नसताना, व्यवसायाची माहिती नसताना, कुणाचेही मार्गदर्शन नसतानाही कितीतरी मराठी तरुण आज उद्योगजगतात पदार्पण करत आहेत आहेत. परंतु पुरेश्या मार्गदर्शनाअभावी या नवउद्योजकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उद्योगाची पूर्वतयारी करावी. पूर्वतयारी करताना काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत.

Advertisement

व्यवसाय निवड :- व्यवसाय निवड हि बहुतेकदा चुकणारी पायरी आहे. पायाच चुकलेला असेल तर इमारत कोसळणारच असते. असच काही व्यवसायाच्या याबाबतीतही घडत असतं. शेजारच्या कुणाचा तरी व्यवसाय यशस्वी झालाय म्हणून आपणही तो व्यवसाय करावा, किंवा एखाद्या वर्तमानपत्रात एखाद्याच्या यशाची कहाणी छापून अली म्हणून आपणही तोच व्यवसाय करावा, किंवा सगळे करतात म्हणून आपणही तेच करावे, किंवा कुणीतरी अमुक तमुक व्यवसाय कर त्यात खूप पैसा आहे असे सांगतोय म्हणून तोच व्यवसाय करावा अशा प्रकारे व्यवसाय निवड करण्याची सर्वसामान्य पण तितकीच चुकीची पद्धत दिसून येते.

व्यवसाय निवडताना तुमच्यासाठी काय योग्य आहे हे पाहायचे असते, ना कि इतरांनी काय केलंय, किंवा किती पैसे कमावलेत. व्यवसाय हा पैसे कमावण्यासाठीच असतो, आणि प्रत्येक व्यवसायात भरपूर पैसे मिळत असतो. त्यामुळे व्यवसाय निवडताना विचारपूर्वक निवडणे महत्वाचे असते.

Advertisement

उद्योगासाठी जागा : काही उद्योगांसाठी मोक्याची जागा असणे आवश्यक असते, तर काहींसाठी मोठे गोडाऊन अथवा साठवणूक करता येईल अशी मोठी जागा असणे गरजेचे असते. अशी जागा थोडी आतल्या बाजूला असली तरी चालते.

ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री, हॉटेल, कपडे, औषधे, सौंदर्यप्रसाधने यांसारख्या उद्योगांसाठी तुम्हाला जागेची निवड काळजीपूर्वक करावी लागते. उदा. हॉटेल, मॉल, आदी उद्योगांसाठी पार्किंगच्या सोयीचा विचार करावा लागेल, अन्यथा त्याचा परिणाम उद्योगावर होईल. त्याचप्रमाणे काही उद्योग घरगुती असतील तर घराची रचना त्याप्रमाणे करावी.

Advertisement

आर्थिक नियोजन : उद्योग सुरू करताना भांडवल ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बँकेकडून कर्ज घेऊन आर्थिक सोय करता येते. कर्ज घेतल्यानंतरही हप्ते भरण्यासाठी सुरुवातीपासूनच दक्ष राहणे गरजेचे आहे. आर्थिक शिस्त पहिल्यापासूनच लावून घेतल्यास उद्योग स्थिरस्थावर होऊन फायदेशीर होण्यास सुरुवात होते. कच्चा माल, जागेची किंमत या गोष्टींचा विचार भांडवल उभारणी करताना लक्षात घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे काही वेळा उद्योग सुरू करेपर्यंत कच्च्या मालाची किंमत वाढू शकते. त्यामुळे राखीव आर्थिक गंगाजळी ठेवणे गरजेचे आहे.

विक्री कला :- ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांमध्ये स्पर्धा सुरू असते. वस्तूंचे आर्थिक विनियोग घडवून आणण्यासाठी विक्रेता जी कौशल्यपूर्ण कला वापरतो त्याला ‘विक्रीची कला’ म्हणतात. व्यापारी कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन तयार करतात.

Advertisement

विक्रेता हा माल किंवा वस्तू प्रभावीपणे ग्राहकांपर्यंत पोचवतात. विक्रेत्याला वस्तूची विक्री करण्यासाठी ग्राहकांशी संपर्क, प्रदर्शन, मालाचे सादरीकरण, वस्तूची उपयुक्तता आणि कमीत कमी किमतीत वस्तूंची खात्री द्यायला लागते.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement