अबब! ‘ह्या’ भारतीय अब्जाधीशाला प्रत्येक सेकंदाला होतेय 32 लाखांचे नुकसान

MHLive24 टीम, 18 जून 2021 :- भारतामढी दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांचे त्रास कमी होण्याचे नाव घेत नाही. सोमवार ते गुरुवारपर्यंत अदानी यांच्या शेअर्समध्ये घट कायम राहिली. ज्यामुळे त्याची संपत्तीही कमी होत आहे. चार दिवसांत त्यांच्या मालमत्तेत 15 अब्ज डॉलर्स म्हणजेच 1.11 लाख कोटी रुपयांची संपत्ती नष्ट झाली आहे.

या चार दिवसांत त्यांना प्रत्येक सेकंदाला 32 लाखाहून अधिक रुपयांचा तोटा झाला आहे. खरं तर, अदानी ग्रुपच्या परकीय फंडांची खाती गोठवल्याची बातमी आल्यानंतर कंपन्यांच्या समभागातील घट थांबलेली नाही.
संपत्तीच्या अशा घट झाल्यानंतर त्यांनी आशियातील दुसर्‍या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीचा दर्जा आधीच गमावला आहे.

Advertisement

त्याच वेळी, ते 3 क्रमकांनी खाली घसरले आहेत. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार तो जगातील श्रीमंतांच्या यादीत 15 व्या स्थानावरून घसरून 18 व्या स्थानावर आले आहे. जर हा ट्रेंड कायम राहिला तर ते आज टॉप 20 मधून बाहेर येऊ शकतात.

5.50 टक्के नुकसान: फोर्ब्सच्या वेबसाइटनुसार, गुरुवारी गौतम अदानीच्या संपत्तीत 5.50 टक्के म्हणजे 3.6 बिलियन डॉलरचे नुकसान झाले. यामुळे त्यांची संपत्ती 62.7 अब्ज डॉलर्सवर आली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात शुक्रवारी गौतम अदानी यांची संपत्ती 77 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होती. हे स्पष्ट आहे की या काळात त्याच्या मालमत्तेत 15 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त तोटा झाला आहे. ज्यामध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे.

Advertisement

एका सेकंदामध्ये 32 लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान: सोमवारपासून आतापर्यंत 15 अब्ज डॉलर्स म्हणजेच 1.11 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. म्हणजेच गौतम बदानीच्या मालमत्तेत दररोज सुमारे 28 हजार कोटी रुपयांची घट झाली. म्हणजेच, प्रत्येक तासामध्ये त्यांचे सुमारे 1160 कोटींचे नुकसान झाले.

गौतम अदानीने दर मिनिटाला 19 कोटी रुपयांची संपत्ती गमावली. त्याचवेळी गौतम उदानी यांचे प्रत्येक सेकंदामध्ये 32 लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. एप्रिलमध्ये त्यांच्याकडे एकूण मालमत्ता 50.5 ब‍िलियन डॉलर होती.

Advertisement

टॉप वर राहण्यासाठी लढाई : दुसरीकडे, टॉप वर राहण्यासाठी जबरदस्त चढाओढ आहे. अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोस आणि फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नाल्ट यांच्यात हा संघर्ष आहे. व्यापार सत्रात, अर्नाल्ट ने बेझोस यांना पराभूत करून दुसर्‍या स्थानावर त्यांना पाठवले होते.

तर, शेअर्समधील अस्थिरतेमुळे,ते पुन्हा दुसर्‍या क्रमांकावर आले. परंतु दोघांच्या संपत्तीमध्ये फरक अगदी किरकोळ आहे. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, जेफ बेझोस यांची एकूण मालमत्ता 200.7 अब्ज डॉलर्स आहे. तर बर्नार्ड अर्नाल्ट अँड फॅमिलीकडे 200.4 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit