Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

लग्नापूर्वीही होती बिल गेट्सची एक गर्लफ्रेंड, लग्न करण्याआधी व्यक्ती केली होती ही विचित्र अट !

0

लग्नाच्या 27 वर्षानंतरही बिल गेट्स आणि मेलिंडाच्या घटस्फोटाची बातमी सर्वत्र पसरली आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि अब्जाधीश बिल गेट्स यापूर्वीही बर्‍याच मुद्द्यांवर चर्चेत राहिले आहेत.

फारच थोड्या लोकांना माहिती आहे की मेलिंडाशी लग्न करण्यापूर्वी बिलची एन विनब्लेड नावाची एक मैत्रीण होती. लग्नाच्या वेळी बिलने तिच्या मैत्रिणीबद्दल मेलिंडासमोर एक चमत्कारिक अट ठेवली होती .

Advertisement

टाइम मासिकाला 1997 मध्ये दिलेल्या मुलाखतीत बिलने याचा उल्लेख केला होता. 1994 मध्ये लग्नाच्या वेळी त्याने मेलिंडाबरोबर एक करार केला होता, त्यानुसार दरवर्षी त्याची जुनी मैत्रीण एन विनब्लेड यांच्याबरोबर लांब कुठेतरी फिरायला जाणार ,असे बिल यांनी म्हटले होते.

एवढेच नव्हे तर बिलने मेलिंडाला प्रपोज करण्यापूर्वी आपल्या मैत्रिणीचीही मान्यता घेतली. मुलाखतीत बिल म्हणाले होते की, ‘जेव्हा मी मेलिंडाशी लग्न करण्याचा विचार करीत होतो, तेव्हा मी प्रथम विनब्लेडला फोन केला आणि त्यांची मंजुरी घेतली. त्यानेही मला यासाठी परवानगी दिली.

Advertisement

विनब्लेड एक सॉफ्टवेअर तज्ञ होत्या आणि त्या बिलपेक्षा ५ वर्षांनी मोठ्या होत्या . वेगवेगळ्या शहरांमध्ये राहत असल्यामुळे विनब्लेड आणि बिल अनेकदा व्हर्च्युअल डेटिंग करत असत.

ते दोघेही एकाच वेळी एक चित्रपट पाहत असत आणि नंतर फोनवर याबद्दल बोलत असे. त्यावेळी मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत विन्ब्लेड म्हणाल्या होत्या , “आम्ही स्वतःबद्दल आणि जगाबद्दलचे विचार एकमेकांना सांगायचो.”

Advertisement

२००५ च्या सॅन फ्रान्सिस्को क्रॉनिकल वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विनब्लेड म्हणाल्या होत्या , “जेव्हा मी आणि बिल एकत्र होतो त्या वेळेस तो मोठा माणूस नव्हता.” एक काळ असा होता की माझी आर्थिक परिस्थिती त्याच्या पेक्षा चांगली होती आणि मला त्याच्या सर्व खरेदींचे बिल द्यावे लागत असत . जरी ही परिस्थिती काही दिवसांसाठीच होती, परंतु तरी ती माझ्यासाठी संस्मरणीय आहे.

त्यावेळी बिल विनब्लेड यांच्या प्रेमात एवढे वेडे होते कि ते तिला आनंदित करण्यासाठी काहीही करण्यास तयार होते. विनब्लेडला खूश करण्यासाठी त्यांनी त्यावेळी नॉन-व्हेज खाणेही बंद केले. बिल नेहमीच मोठा विचार करत असे आणि बिनच्या आत्मविश्वासाने विनब्लेड प्रभावित झाल्या.

Advertisement

2013 मध्ये सिलिकॉन व्हॅली बिझिनेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत विन्ब्लेड म्हणाल्या , एकदा बिल आणि मी फिरायला गेलो होतो. बिल म्हणाले की ज्या दिवशी मला 500 दशलक्ष डॉलर्स उत्पन्न मिळू लागेल त्या दिवशी मला वाटेल की मी आता माझ्या मार्गावर आहे.

विन्ब्लाड म्हणाल्या , ‘मी बिलवर खूप प्रभावित होते. मला वाटायचे की प्रत्यक्षात ते एक कंपनी तयार करू शकतात जी सॉफ्टवेअर उद्योगात सर्वात मोठी असेल . बिल मला खूप प्रेरणा देत असे. त्याच वेळी, बिल म्हणाले, “विनब्लेड खूप मजेदार होती आणि एखादे गंभीर वातावरण ती खूप आनंदित करीत असे. ती खूप हुशार होती.

Advertisement

बिलने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘जेव्हा आम्ही आठवड्यासाठी सांता बार्बराला फिरायला गेलो होतो ती विनब्लेडबरोबरची माझी आवडती सहल होती.

बायोटेक्नॉलॉजी समजून घेण्यासाठी त्याच्याशी संबंधित चित्रपटांच्या सीडीस आम्ही सोबत घेऊन गेलो होतो . बाहेर हवामान चांगले होते पण फिरण्याऐवजी आम्ही आत बसून तासन्तास चित्रपट बघायचो.

Advertisement

1987 मध्ये, विनब्लेड आणि बिलचा ब्रेकअप झाला, परंतु त्यानंतरही, ते वर्षातून एकदा तरी भेटत राहिले. नंतर विनब्लडने अ‍ॅलेक्स क्लाइन नावाच्या माणसाशी लग्न केले.

27 वर्षानंतर बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलांडा यांच्या विभक्ततेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. वृत्तानुसार, बिल गेट्स आपले कौटुंबिक जीवन आणि करिअर संतुलित करण्यास असमर्थ असल्याचे मेलंडा सांगते.

Advertisement

😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news

Advertisement