Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

इस्त्री न करता अशा प्रकारे मिटवा कपड्यांवरील सुरकुत्या, कपडे दिसतील व्यवस्थित

0 0

MHLive24 टीम, 23 जून 2021 :- कधीकधी आपल्याला घाई असते, आपल्याकडे कपड्यांना इस्त्री करण्यासाठी पुरेसा वेळही नसतो किंवा बर्‍याच वेळा आपल्याकडे इस्त्री उपलब्ध नसते .

अशा परिस्थितीत दुमडलेले कपडे घालणे कोणालाही आवडत नाही, तसेच त्यामुळे आपले व्यक्तिमत्त्व देखील छान दिसत नाही , अशा परिस्थितीत आपले काम खराब होऊ शकते, म्हणूनच इस्त्री नसेल तर ह्या उपाययोजनांचा अवलंब करुन आपण आपल्या कपड्यांवरील घड्या सहजपणे काढू शकता.

Advertisement

बेडवरील गादीखाली ठेवा कपडे :- समजा तुम्हाला सकाळी काही महत्वाचे काम करायला जायचे असेल आणि कपड्यांवर सुरकुत्या असतील, आणि तुमची इस्त्री काम करत नसेल तर अस्वस्थ होण्याऐवजी हा पर्याय वापरून पहा.

जीन्स ,पॅन्ट , साड्या, ओढणी इत्यादीं कपडे व्यवस्थित पलंगाच्या गादीखाली ठेवा. नंतर वेळ मिळाल्यास कपडे पलटून ठेवा . सकाळपर्यंत जेव्हा आपल्याला कपडे घालावे असतील तोपर्यंत कपड्यांवरील सर्व सुरकुत्या गेलेल्या असतील .

Advertisement

व्हिनेगर वापरा :- जर आपल्याकडे हॅन्गर असेल तर त्यावर कपडे लटकवून ठेवा , अन्यथा कपडे पूर्णपणे पसरवून ठेवा . नंतर एक स्प्रेची बाटली घ्या, त्यात व्हिनेगर टाका . आता जिथे कपड्यावर सुरकुत्या असतील तिथे हे व्हिनेगरचे मिश्रण फवारा. जसे जसे कपडे सुकतील तशा त्यावरील सुरकुत्या मिटलेल्या असतील. आणि कपड्यांना इस्त्री केलेली नाही असेही वाटणार नाही .

ओल्या टॉवेलच्या मदतीने काढा सुरकुत्या :-  जेव्हा आपल्याला कोणताही मार्ग दिसत नसेल , तेव्हाही कोणतातरी मार्ग हा असतोच , जेव्हा कोणताही पर्याय दिसत नसेल , तर हा सोपा पर्याय वापरुन पहा. कपडे पसरवून ठेवा आणि टॉवेल ओला करून त्याला पिळून घ्या. आता हळूहळू हा टॉवेल दुमडलेल्या जागेवर दाबून ठेवा. असे केल्यास कपड्यांवरील सुरकुत्या मिटतील.

Advertisement

वॉशिंग मशीनचे ड्रायर वापरा :- जर आपल्या घरात वॉशिंग मशीन असेल तर आपण कपड्यांवरील सुरकुत्या सहजपणे काढू शकता. वॉशिंग मशीन ड्रायरमध्ये दोन ते तीन बर्फाचे तुकडे ठेवा. मग दुमडलेले कपडे त्यात टाका. ड्रायर वापरा आणि त्यानंतर कपडे हँगरला लटकवून ठेवा. थोड्या वेळात, कपड्यांवरील सुरकुत्या मिटलेल्या असतील .

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement