Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

ईपीएफओने अ‍ॅडव्हान्स काढण्याची दिली परवानगी; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आर्थिक दिलासा, ‘असे’ काढा पैसे

0 24

MHLive24 टीम, 22 जून 2021 :-  देशामध्ये कोरोनाचे संक्रमण फैलावले असताना या दुसऱ्या लाटेमधे महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा विस्फोट झाला होता. महाराष्ट्र यात अव्वल राज्य होते. परंतु आता महाराष्ट्रामधून रुग्णसंख्या कमी होत आहे. सध्या कोरोनावर लसीकरण हाच एकमेव उपाय सध्यातरी आहे. परंतु या लाटेमधे प्रचंड आर्थिक नुकसान झाले.

आज प्रत्येक नागरिक आर्थिक विवंचनेत आहे. आता यात काहीसा दिलासा ईपीएफओने दिला आहे. एडवांस पैसे काढण्याची सुविधा दुसर्‍या लाटेमध्ये पुन्हा सुरू केली गेली आहे. ज्याचा फायदा देशातील 5 कोटी ईपीएफओ सदस्यांना होणार आहे.

Advertisement

सदस्यांना तीन महिन्यांचा मूलभूत वेतन (मूलभूत वेतन + महागाई भत्ता) किंवा त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात जमा होणाऱ्या रकमेपैकी 75 टक्क्यांपर्यंत जे काही कमी असेल त्यास पैसे काढण्याची मुभा देण्यात येईल. कोविडच्या दुसर्‍या लाटेमुळे देशात प्रचंड कहर निर्माण झाला आहे. बर्‍याच लोकांच्या नोकर्‍या गमावल्या आहेत आणि अनेकांच्या पगारावर त्याचा वाईट परिणाम झाला आहे.

काय आहेत खास गोष्टी ? 

Advertisement
 • ईपीएफओ ग्राहकांना आजारपण, घर खरेदी इत्यादी विशिष्ट घटनांमध्ये नॉन-रिफंडेबल एडवांस रक्कम काढण्यास परवानगी देतो.
 • आता COVID-19 (साथीचा रोग) चा हवाला देऊन लोक त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकतात.
 • ईपीएफओ कोविड -19 अंतर्गत दावा तीन दिवसात निकाली काढेल.
 • क्लेम त्वरेने निकाली काढण्यासाठी केवायसीची कागदपत्रे पूर्ण करणाऱ्यांसाठी ऑटो-क्लेम सेटलमेंट प्रक्रिया तयार केली गेली आहे.
 • आधीच ज्यांनी COVID-19 अ‍ॅडव्हान्स चा लाभ घेतला असेल तरीही ते सभासद आता दुसऱ्या अ‍ॅडव्हान्सचीही निवड करू शकतात.
 • दुसरे COVID-19 अ‍ॅडव्हान्स काढण्याची तरतूद व कार्यपद्धती पहिल्या प्रमाणेच आहे.
 • कोविड-19 एडवांस घेण्यासाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धती अवलंबल्या जाऊ शकतात.

ऑनलाईन  ईपीएफओ अ‍ॅडव्हान्स कसा काढावा ?

 • ईपीएफ पोर्टल  https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface वर लॉगिन करा.
 • ड्रॉप डाऊन मेनूमध्ये ऑनलाइन सर्विसेज मध्ये पोहोचल्यानंतर Claim (Form-31,19,10C & 10D) वर क्लिक करा.
 • बँक खात्यातील शेवटचे 4 अंक प्रविष्ट करुन अकाउंट वेरिफाई करा.
 • Proceed for Online Claim वर क्लिक करा.
 • ड्रॉप डाऊन मेन्यूमधून पीएफ अ‍ॅडव्हान्स (फॉर्म 31) वर क्लिक करा.
 • यानंतर  Outbreak of pandemic (COVID-19) पर्याय निवडा.
 • किती रक्कम आवश्यक आहे आणि चेकची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल. कृपया घराचा संपूर्ण पत्ता प्रविष्ट करा.
 • Get Aadhaar OTP  मार्फत ओटीपी व्हेरिफाय करा. त्यानंतर आपला अर्ज केला जाईल.
 • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
 • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement