अबब! एलन मस्क यांनी एका दिवसात कमावले 2,71,50,00,000,000; रचला नवा इतिहास

MHLive24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- एलन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वास्तविक, Tesla inc.चे सीईओ एलन मस्क यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांची एकूण संपत्ती $36.2 अब्जने वाढली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची संपत्ती सोमवारी 288.6 अब्ज डॉलरवर पोहोचली.(Elon musks earning)

त्यांनी आत नवा विक्रम केला आहे. मस्क यांच्या संपत्तीत एकाच दिवसात २.७१ लाख कोटी रुपयांची (३६.२ अब्ज डॉलर) भर पडली आहे. कोणत्याही श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत एका दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.

Tesla च्या Elon Musk यांच्या संपत्तीत 2.71 लाख कोटींची वाढ झाली आहे. Bloomberg Billionaires Index नुसार मस्क यांची संपत्ती 289 अब्ज डॉलर्स झाली आहे. सोमवारी एलन मस्क यांच्या संपत्तीत 2.71 लाख कोटी रुपयांची (36.2 अब्ज डॉलर) वाढ झाली.

Advertisement

कंपनीच्या शेअरच्या किंमतीत १४.९ टक्क्यांची वाढ होत तो १,०४५.०२ डॉलरवर पोचला आहे. शेअरच्या किंमतीत आलेल्या तेजीमुळे इलॉन मस्क यांच्या संपत्तीत एकदम वाढ झाली आहे.

हर्टज ग्लोबल होल्डिंग्सने १ लाख टेस्ला कारची ऑर्डर दिली आहे. १ लाख कारची ऑर्डर मिळाल्यानंतर टेस्लाच्या शेअरच्या किंमतीत जबरदस्त तेजी आली आहे. टेस्लामध्ये इलॉन मस्क यांचा २३ टक्के मालकी हिस्सा आहे. शेअरच्या किंमतीत आलेल्या तेजीमध्ये इलॉन मस्क यांची संपत्ती २.७१ लाख कोटी रुपयांनी वाढली आहे.

याशिवाय इलॉन मस्क स्पेसएक्स या कंपनीचे मालक आहेत. जाणकारांनुसार या कंपनीचे मूल्य १०० अब्ज डॉलर आहे. २०२१ मध्ये इलॉन मस्क यांच्या संपत्तीत ११९ अब्ज डॉलरची जबरदस्त वाढ झाली आहे. मस्क यांची एकूण संपत्ती २८९ अब्ज डॉलर आहे. एक्झॉन मोबिल कॉर्प किंवा नाइके इन्कॉर्पोरेशनच्या बाजारमूल्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker