Take a fresh look at your lifestyle.

दसरा मेळावा : उद्धव ठाकरेंचं भाषण व्यासपीठावरूनच: संजय राऊत

0

Mhlive24 टीम, 17 ऑक्टोबर 2020 :- अनेक वर्षांची परंपरा असलेला शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी खास असतो. हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरेंच्या काळात या दसरा मेळाव्याची सुरुवात मुंबईमध्ये करण्यात आली.

Advertisement

यानंतर शिवसेनाप्रमुख दसऱ्याचं औचित्य साधून शिवसैनिकांना संबोधित करण्याला कधीच खंड पडला नाही. कोरोनामुळे शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा ऑनलाइन होणार असल्याच्या जोरदार चर्चा असून या चर्चांना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे.

Advertisement

कुणी सांगितलं शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाइन होईल? उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी ते पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांचं भाषण हे व्यासपीठावरूनच होईल. त्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे,

Advertisement

असं सांगत संजय राऊत यांनी शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दणक्यात होणार असल्याचे संकेत दिले आहेत. दसरा मेळाव्याचं महत्त्व राजकीय आणि सांस्कृतिक देखील आहे. त्यामुळे दसरा मेळावा कसा घ्यायचा याबाबत चर्चा होईल.

Advertisement

नियम आणि आरोग्याच्या दृष्टीनं योग्य होईल, अशा पद्धतीनं नियोजन केलं जाईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. यंदा खुद्द शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदावर विराजमान असताना शिवाजी पार्कवर पार पडणाऱ्या या सोहळ्यावर कोरोनाचे सावट आहे.

Advertisement

मात्र हा दसरा मेळावा ऑनलाईन होणार कि लोकांच्या उपस्थितीत होणार याबाबत मुख्यमंत्र्यानी खुलासा केलेला नाही. यंदाचा दसरा दोघांसाठी आहे खास उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर यंदाचा पहिलाच दसरा मेळावा आहे.

Advertisement

हा दसरा मेळावा मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचं नियोजन शिवसेना नेत्यांचं होतं, मात्र कोरोनामुळे आता ते शक्य होणार नाही. महाविकास आघाडीच्या सरकारचाही हा पहिलाच दसरा आहे.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li