Take a fresh look at your lifestyle.

शरद पवारांच्या दौऱ्यात चोरटयांनी आमदारांची चार तोळा चैन लांबवली

0

Mhlive24 टीम, 18 ऑक्टोबर 2020 :-   शरद पवार आज नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांना शरद पवारांनी भेटी देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

Advertisement

अतिवृष्टीमुळे राज्यात मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे बळीराजाला आधार देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर आहेत.

Advertisement

पवारांच्या या दौऱ्यात चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. शिवसेना आमदार ज्ञानराज चौघुले यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरीला गेली. अज्ञात चोरट्याने ही चेन लंपास केली.

Advertisement

आमदारांचीच चैन लंपास झाल्याने सर्वत्र एकच धांदल उडाली. परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

Advertisement

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शरद पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. यावेळी उमरगा तालुक्याचे शिवसेना आमदार ज्ञानराज चौघुले देखील पवारांसोबत आहेत.

Advertisement

चौगुले यांच्या गळ्यात 4 तोळे वजनाची चेन होती. या चेनीची किंमत जवळपास 2 लाख रुपये होती. मात्र गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने आमदार चौगुलेंच्या गळ्यातील चेन लंपास केली.

Advertisement

चेन चोरीला गेल्यानंतर आमदार चौगुले यांनी याप्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार दिलेली नाहीये. मात्र झाल्या प्रकाराने यंत्रणेची चांगलीच धापवळ उडाली. खुद्द आमदार साहेबांचीच चेन लंपास झाल्यानंतर पोलिस सतर्क झाले आहेत

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li