Check bounce effect : चेक बाऊन्स होण्याच्या प्रक्रियेस हलक्यात घेऊ नका; आता होतेय ‘अशी’ शिक्षा, जाणून घ्या काय आहे नियम

MHLive24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- आजकाल बहुतांश ट्रांजेक्शन डिजिटल ट्रांजेक्शन च्या माध्यमातून होत आहेत. परंतु तरीही मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी धनादेश अर्थात चेक वर अधिक अवलंबून राहावे लागत आहे. यामागे अनेक मोठी कारणे आहेत. सर्वात मोठे कारण म्हणजे फसवणूक टाळणे आणि बँकेकडे आणि स्वतःकडे सम्बंधित व्यवहाराचे रेकॉर्डिंग ठेवणे.(Check bounce effect)

परंतु बरेचदा लोक चेकचे व्यवहार अगदी हलक्यात घेतात. आणि खात्यात पुरेशी शिल्लक नसल्यामुळे त्यांचे चेक बाऊन्स होतात.

त्यानंतर त्यांना दंड भरावा लागतो, यासोबतच अनेकवेळा शिक्षा देखील भोगावी लागते. याठिकाणी आम्ही तुम्हाला चेक बाऊन्स झाल्यास RBI च्या नियमांनुसार काय कारवाई होऊ शकेल याबद्दल सांगणार आहोत.

Advertisement

चेक बाऊन्स होणे हा गुन्हा – आरबीआयच्या नियमांनुसार चेक बाऊन्स होणे हा कलम 138 प्रमाणे दंडनीय गुन्हा आहे. यामध्ये खातेदाराला दंडासह दंड ठोठावला जातो आणि त्याला 2 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षाही होऊ शकते. कायदेशीर कारवाई टाळायची असेल तर चेक देताना नेहमी तुमच्या खात्यात पुरेशी शिल्लक ठेवा.

चेक बाऊन्स झाल्यास दंड – चेक बाऊन्स झाल्यास दंडाची रक्कम खात्यातून वजा केली जाते. यासोबतच, तुम्हाला धनादेश बाऊन्स झाल्याची माहिती संबंधिताला द्यावी लागेल आणि एक महिन्याच्या आत धनादेश देणाऱ्याला देणे बंधनकारक आहे.

चेकमध्ये लिहिलेली रक्कम महिन्यात भरली नाही तर त्यानंतर तुम्हाला कायदेशीर नोटीस मिळू शकते. प्रतिसाद दिला नाही तर Negotiable Instrument Act 1881 च्या कलम 138 अंतर्गत तुमच्या विरुद्ध खटला दाखल केला जाऊ शकतो.

Advertisement

दंडासह दोन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद – चेक बाऊन्स झाल्यास कलम 138 प्रमाणे गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. दोन वर्षांपर्यंत शिक्षा किंवा दंड, किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते. चेक बाऊन्स झाल्यास, तुमचे खाते असलेल्या शहरात गुन्हा दाखल केला जाईल.

चेकची वैधता 3 महिने आहे – ज्या तारखेला चेक कापला जातो. चेकची वैधता त्या दिवसापासून तीन महिने राहते. या कालावधीत तुम्ही खात्यातून धनादेश रक्कम काढली नाही तर चेक आपोआप रद्द होतो. अशा परिस्थितीत कोणतीही कायदेशीर कारवाई करता येत नाही. यापूर्वी चेकची वैधता 6 महिने होती.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker