Advertisement
ब्रेकिंग

Important News: तुमच्या बँक खात्यात पैसे नसले तरीही तुम्हाला मिळतील 10 हजार रुपये; कसे? वाचा अन फायदा घ्या

Share
Advertisement

MHLive24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- तुमचे जर बँकेत खाते असेल आणि त्यात पैसे नसतील तरीही तुम्हाला 10 हजार रुपये मिळू शकतात. मात्र यासाठी तुमच्याकडे जन धन खाते असणे आवश्यक आहे. अद्यापही जर तुम्ही प्रधानमंत्री जन-धन योजनेअंतर्गत खाते उघडले नसेल, तर ते आताच उघडून घ्या.(Important News)

जन धन योजनेअंतर्गत बँक खाती झिरो बॅलन्सवर उघडली जातात. केंद्र सरकारच्या या योजनेला 7 वर्षे पूर्ण झाली असून आतापर्यंत 41 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत.

या योजनेत विम्यासह अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. यातील एक सुविधा म्हणजे ओव्हरड्राफ्ट. त्याबद्दल आम्ही तुम्हाला याठिकणी सांगणार आहोत

Advertisement

10 हजार रुपये कसे मिळतील ?

जन धन योजनेअंतर्गत, तुमच्या खात्यात शिल्लक नसली तरीही, तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल. ही सुविधा अल्प मुदतीच्या कर्जासारखी आहे. या आधी सदर रक्कम 5 हजार रुपये भेटत होती. आता सरकारने ती 10 हजारांपर्यंत वाढवली आहे.

या खात्यातील ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी कमाल वयोमर्यादा 65 वर्षे आहे. ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे जन धन खाते किमान 6 महिने जुने असावे. नसल्यास, फक्त 2,000 रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट उपलब्ध आहे.

Advertisement

सदर योजना 2014 मध्ये सुरू झाली होती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भाषण करताना जन धन योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. ही योजना त्यावर्षी 28 ऑगस्ट रोजी सुरू झाली होती.

या योजनेअंतर्गत 6 जानेवारी 2021 पर्यंत एकूण जन धन खात्यांची संख्या 41.6 कोटी झाली आहे. सरकारने या योजनेचे दुसरे सत्र 2018 मध्ये अधिक वैशिष्ट्ये आणि फायद्यांसह लॉन्च केली.

Advertisement

जन धन योजनेत अनेक सुविधा उपलब्ध आहेत

जन धन योजनेअंतर्गत 10 वर्षांखालील मुलाचेही खाते उघडता येते.
या योजनेअंतर्गत खाते उघडल्यावर तुम्हाला रुपे एटीएम कार्ड, 2 लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण, 30 हजार रुपयांचे जीवन संरक्षण आणि ठेव रकमेवर व्याज मिळते.
यावर तुम्हाला 10 हजारांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधाही मिळते.
हे खाते कोणत्याही बँकेत उघडता येते.
यामध्ये तुम्हाला किमान शिल्लक राखण्याची गरज नाही.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

This post was published on November 26, 2021 3:03 PM

Advertisement
Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi