Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

५जी तंत्रज्ञानाचा आरोग्यावर कोणताही परिणाम होतो कि नाही ?

0

MHLive24 टीम, 7 जून 2021 :-  देशात सध्या ५जी तंत्रज्ञानाची चाचणी सुरू असून, लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे; परंतु अनेक सामाजिक संस्था तसेच पर्यावरणप्रेमींकडून ५जी तंत्रज्ञान धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे.

या पार्श्वभूमीवर सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीओएआयने यासंदर्भातील सर्व आरोप-दावे फेटाळून लावत ५जी तंत्रज्ञान पूर्णपणे सुरक्षित असून, त्याचा आरोग्यावर कोणताही परिणाम होत असल्याचा खुलासा केला आहे.

Advertisement

५-जी नेटवर्कच्या अखंड किरणोत्साराने मानव, प्राणी आणि निसर्गावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. मोबाईल कंपन्यांनी ५जी तंत्रज्ञान कार्यान्वित केल्यास सर्व व्यक्तींना, वनस्पतींना आरएफ किरणोत्साराचा त्रास सहन करावा लागेल.

सध्याच्या तुलनेत तो किमान १० ते कमाल १०० पटींनी अधिक असू शकतो, असा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सीओएआयने सर्व दावे-आरोप फेटाळून लावले आहे. ५जी तंत्रज्ञानाने व्यक्ती-प्राण्यांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही.

Advertisement

५जी तंत्रज्ञानामुळे अर्थव्यवस्था आणि समाजाला मोठा फायदा होणार आहे. देशात नवे तंत्रज्ञान कार्यान्वित झाल्यानंतर मोठी क्रांती घडवून येत आहे. भारतात आरएफ किरणोत्सारासंदर्भातील नियम अत्यंत कडक आहेत.

जागतिक पातळीवरील नियमांपेक्षा भारताची नियमावली सर्व बाबींनी विचार करून करण्यात आली आहे, असे सीओएआयचे महासंचालक एस. पी. कोचर यांनी सांगितले.

Advertisement

किरणोत्सव प्रभाव ही बाब संभ्रम निर्माण करणारी असून जागतिक नियमाच्या तुलनेत भारतात किरणोत्सवासंदर्भात केवळ १० टक्क्यांची परवानगी आहे, असेही कोचर म्हणाले.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement