Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

मुकेश अंबानींच्या पत्नी नीता अंबानींविषयी ‘ह्या’ गोष्टी माहिती आहेत का? वाचून व्हाल दंग !

0 3

strong>MHLive24 टीम, 22 जून 2021 :- निता अंबानी या जगात सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या पत्नी आहेत. निता या नेहमीच हेडलाईनमध्ये असतात. त्या मध्यमवर्गीय कुटुंबातून असल्या तरी आता त्या एका श्रीमंत कुटुंबाच्या सून आहेत. त्यांच्या आवडीही यूनिक आहेत. इंटरनेटवरील रिपोर्टनुसार निता अंबानींचे 8 छंद खूप महागडे असून सर्वसामान्य लोक त्याची कल्पनाही करु शकत नाही.

57 वर्षांच्या निता अंबानी तिच्या सकाळची सुरुवात सुमारे तीन लाख रुपये किंमतीच्या चहाने सुरु करते. नीता यांना लक्झरी जीवनशैली तसेच मौल्यवान वस्तूंची आवड आहे. मिसेस अंबानी केवळ महागड्या वाहनांमध्येच फिरत नाहीत, तर त्यांचे स्वत:चे खासगी विमानही आहे ज्यामध्ये त्यांना प्रवास करायला आवडते. त्यांच्या या विमानाविषयी जाणून घ्या –

Advertisement

आतील दृश्य खूप आलीशान आहे

खासगी विमान नीता अंबानी यांना मुकेश अंबानी यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिले होते. या खासगी विमानाची किंमत 230 कोटी आहे. मुकेश अंबानी यांनी त्यांच्या 44 व्या वाढदिवशी निता अंबानी यांना एअरबस -368 लक्झरी सानुकूलित खासगी विमान भेट दिले होते. या विमानमध्ये, 10-12 लोक एकत्र प्रवास करू शकतात.

Advertisement

या खासगी विमानाचे अंतर्गत दृश्य अतिशय नेत्रदीपक आहे. मुकेश अंबानी यांनी नीताच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार हे जेट कस्टमाइज केले होते. या विमानाच्या आत बऱ्याच सुविधा आहेत की ज्या 5 स्टार हॉटेलदेखील त्याच्या पुढे फिके पडेल. विमानाच्या आत डायनिंग हॉल आहे. त्याच वेळी, त्यांचा मूड लाइट करण्यासाठी एक स्काई बार देखील आहे.

नीता अंबानी यांना महागडे कपडे, दागिने, बॅग आणि ब्रँडेड घड्याळाची देखील आवड आहे. त्यांच्याकडे अनेक पिशव्या व घड्याळांचे संग्रह आहेत. ज्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Advertisement

तीन लाख रुपयांचा चहा

निता अंबानी यांनी स्वत:च एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्या जपानच्या सर्वात जुन्या क्रॉकरी ब्रँड असलेल्या नोरिटेकमध्ये चहा पितात आणि या एका कपाची किंमत 3 लाख रुपये आहे.

Advertisement

डायमंड लावलेले बॅग

निता आपल्या स्टाईलनुसार वेगवेगळ्या बॅग वापरतात. या बॅगेवर डायमंड लावलेले असतात. निता यांच्याकडे जगातील सर्वात महागड्या ब्रँडचे बॅग आहेत. या बॅगांवर लावण्यात आलेल्या डायमंडची किंमत 4 लाखांच्या पुढे असते.

Advertisement

एकदा वापरलेले शूज पुन्हा वापरत नाही

निता अंबानी यांना महागड्या शूज आणि सँडलची खूप आवड आहे. त्यांच्याकडे पेट्रो, गार्सिया, जिमी चू, पेल्मोरा, मर्लिन यासारख्या ब्रँडचे शूज आहेत. यांची किंमत 1 लाखांपासून सुरु होते. असं म्हटलं जातं की निता एकदा वापरलेले शूज पुन्हा वापरत नाहीत.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup