Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

सूर्यनमस्काराचे ‘हे’ विशेष फायदे माहित आहेत का? वाचा…

0 153

MHLive24 टीम, 22 जुलै 2021 :- सूर्याशिवाय सजीव सृष्टी अस्तित्वात येऊ शकत नाही. सूर्यनमस्कार म्हणजे सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी. पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा दाता हा सूर्यच. सूर्यनमस्कार हा एक १२ आसनांचा ठरलेला चक्राकार क्रम आहे. हा योगाभ्यास शरीर, मन व श्वासाला एकत्र आणतो.

ध्यानात जाण्याची ती पहिली पायरी आहे. ’ सूर्यनमस्कार जलदगतीने केल्यास तो एक चांगला व्यायाम ठरू शकतो. पण कमी गतीने सूर्यनमस्कार केल्याचेही फायदे आहेतच. जेव्हा आपण दहा सूर्यनमस्कार घालतो तेव्हा शंभर योगासने पूर्ण केल्यासारखी असतात.

Advertisement

सूर्यनमस्कारात प्राणायाम व दीर्घ श्वसनाच्या व्यायामाचाही भाग आहेच. त्यामुळे अचूक सूर्यनमस्कार घालता येत असतील तर प्राणायामचाही फायदा मिळतो. हृदयापासून डोक्यापर्यंत आणि मनापासून पोटापर्यंत सर्वांना उत्तम आरोग्य मिळण्याचे हे उत्तम आसन आहे. त्याचे फायदे

१) आनंददायी जीवन :- सूर्यनमस्कार केल्यानं केवळ शरीरचं निरोगी होत नाही तर मनही ताजेतवाने राहते. यामुळे शरीरात शुद्ध ऑक्सिजन वाढतं. ज्यामुळे ब्लड सर्कुलेशन सुद्धा वेगानं होतं.

Advertisement

२) पचनक्रिया सुधारते :- सूर्यनमस्कार केल्यानं शरीरासोबतच पोटाजवळही बराच तणाव वाढतो. हा तणाव पोटाची पचनक्रिया चांगलं करण्यासाठी असतो. पचन तंत्र सुधारल्यावर शरीरातल्या अर्ध्या समस्या दूर होतात. बद्धकोष्ठता, अपचन किंवा पोटात जळजळ होणे किंवा ढेकर येणं या आणि अशा इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.

३)चरबी कमी होते :- सूर्यनमस्कार केल्यानं पोटावर सर्वात जास्त इफेक्ट पडतो आणि हे कारण आहे की, पोटाची चरबी वेगानं कमी होण्यास सुरूवात होते. पोटाचे स्नायू देखील मजबूत होतात. पूर्ण शरीरातील वजन सहज कमी होण्यास सुरूवात होते.

Advertisement

४) फुप्फुसांना बळकटी येते :- सूर्यनमस्कार करताना दिर्घ श्वास घ्यावा आणि सोडावा लागतो. यामुळे शरीरात शुद्ध ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि कार्बन डायऑक्साइड आणि अन्य विषारी तत्त्व सुद्धा बाहेर येतात. फुफ्फुसांना बळकटी मिळते.

५) स्मरणशक्ती सुधारते :- सूर्यनमस्काराने स्मरणशक्ती सुधारते. सूर्यनमस्काराचा परिणाम नर्व्हस सिस्टमवर पडतो आणि हे केल्यानं मेंदूमधून चांगल्या हार्मोन्सचे स्राव वाढतो. यामुळे स्मरणशक्ती देखील वाढते.

Advertisement

इतर फायदे

  • बाहू व कंबर यांचे स्नायू बळकट होतात.
  • पाठीचा मणका व कंबर लवचिक होतो.
  • पोटाजवळची चरबी वितळून वजन कमी होण्यास मदत होते.
  • पचनक्रिया सुधारते.
  • मनाची एकाग्रता वाढते.

सूर्यनमस्कार घालतांना करावयाच्या श्वसनक्रियांचे अर्थ

Advertisement
  1. पूरक म्हणजे दीर्घ श्वास आत घेणे
  2. रेचक म्हणजे दीर्घ श्वास बाहेर सोडणे
  3. कुंभक म्हणजे श्वास रोखून धरणे. आंतर्कुंभक म्हणजे श्वास आत घेऊन रोखणे व बहिर्कुंभक म्हणजे श्वास बाहेर सोडून रोखणे

सूर्यनमस्कार घालतांना करावयाचे विविध नामजप

१. ॐ मित्राय नम: ।
२. ॐ रवये नम: ।
३. ॐ सूर्याय नम: ।
४. ॐ भानवे नम: ।
५. ॐ खगाय नम: ।
६. ॐ पूष्णे नम: ।
७. ॐ हिरण्यगर्भाय नम: ।
८. ॐ मरिचये नम: ।
९. ॐ आदित्याय नम: ।
१०. ॐ सवित्रे नम: ।
११. ॐ अर्काय नम: ।
१२. ॐ भास्कराय नम: ।

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit