Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

गाजर खाण्याचे ९ जबरदस्त फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?

0 2

MHLive24 टीम, 5 जून 2021 :- आपल्याकडे गाजराची कोशिंबीर, कच्च गाजर, गाजराचा हलवा, गाजराच्या वड्या असे अनेक प्रकार तयार केले जातात.

परंतु नुसतं गाजर रोज खाल्ल्यानं आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि वेगवेगळ्या धोकादायक आजारांपासून आपल्याला दूर राहण्याची क्षमता वाढता.

Advertisement

रोज एक गाजर खाल्ल्यानं तुम्हाला हृदयविकाराचा धोका, कर्करोग, डोळ्यांचे विकार या आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता.काय आहेत गाजराचे फायदे? जाणून घ्या

  1. गाजरानं पचनशक्ती सुधारते. गाजरात बिटा कॅरेटिन असतं. ते कॅन्सरला प्रतिबंधक ठरतं.
  2. गाजर कच्चं खावं. त्यानं जास्त फायदा होतो. गाजरामुळे वजन वाढत नाही त्यामुळे तुम्ही रोज एक गाजर बिनधास्त खाऊ शकता.
  3. गाजरापेक्षा गाजराच्या पानांमध्ये लोह असतं. त्यानं अॅनिमिया दूर होतो.
  4. थंडीत गाजराचं सेवन केल्यानं शरीरात उब राहते.
  5. गाजराचा रस आणि मध एकत्र करून प्यायल्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  6. गाजरांच्या पानांची भाजी तयार केली जाते. ती बनल्यावर उरलेलं पाणी पाऊन घ्या. त्यात पोषकद्रव्य असतात.
  7. पालक आणि गाजराचा रस एकत्र करून प्यायल्यास तब्येत सुधारते.
  8. गाजरात अ जीवनसत्व असतं. रोज एक गाजर खाल्ल्यानं चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते. तसंच डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.
  9. गाजरात कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन सी, ए असतं. त्यानं हृदयरोगावरही मात करता येते.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

 

Advertisement