Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

तुमच्याकडेही आहे पाचशे रुपयांची ‘अशी’ नोट? समोर आली महत्वाची बातमी

0 2

MHLive24 टीम, 27 जून 2021 :- भारतीय चलन 500 रुपयांच्या नोटांविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे. सरकारी फैक्ट चेकर प्लॅटफॉर्म पीआयबी फॅक्टचेक यांनी तो दावा खोडून काढला आहे कि ज्यात 500 रुपयांच्या खऱ्या आणि खोट्या नोटांविषयी लोकांना भ्रमित केले जात आहे.

खरं तर पीआयबी फॅक्ट चेकच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सोशल मीडियावर व्हायरल झालेला बनावट दावा नाकारला गेला आहे. व्हायरल पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की 500 च्या अशा नोट्स घेऊ नयेत ज्यात हिरवि पट्टी आरबीआयच्या गव्हर्नरच्या स्वाक्षरीजवळ नसून गांधीजींच्या चित्राजवळ आहे.

Advertisement

व्हायरल पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की ‘गांधीजी जवळ हिरव्या पट्टी असलेल्या 500 रुपयांच्या नोटांना घेऊ नका, कारण ती बनावट आहे. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या स्वाक्षरी जवळ हिरव्या पट्ट्या असलेल्या अशाच 500 नोटा घ्या. कृपया हा संदेश तुमच्या कुटूंबाला आणि मित्रांना द्या.’

या व्हायरल पोस्टवर पीआयबी फॅक्ट चेकने म्हटले आहे की हा दावा खोटा आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या म्हणण्यानुसार दोन्ही प्रकारच्या नोटा वैध आहेत. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बनावट बातम्यांची सत्य माहिती दिली जाते.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement