एटीएममधून पैसे काढल्यानंतर त्वरित करा ‘हे’ ; अन्यथा व्हाल फसवणूकीचे शिकार

Mhlive24 टीम, 22 जानेवारी 2021:–एटीएममधून रोकड काढून घेताना ग्राहकांनी अनेक प्रकारच्या खबरदारी घेणे आवश्यक आहे. एटीएम मधून पैसे काढल्यानंतर ग्राहक फसवणुकीचे बळी ठरतात असे बर्याचदा पाहिले जाते. जेव्हा ठग तुम्हाला चुना लावतात तेव्हा आपल्याला त्याची साधी भनकही लागत नाही. अशा परिस्थितीत सतर्क रहाणे हेच आपल्याला अशा फसवणूकीपासून वाचवू शकते.
एटीएम फसवणूकीच्या बर्याच पद्धती आहेत ज्याद्वारे लोकांना फसवणूकीचा बळी बनविला जातो. एटीएममधून पैसे काढल्यानंतर ग्राहकांनी त्वरित कॅन्सल बटण दाबावे. असे करण्याचा अर्थ म्हणजे आपल्या एटीएम कार्डाद्वारे आता कोणतीही गतिविधी केली जाऊ शकत नाही.
तसेच एटीएम निवडताना खूप काळजी घ्या. उदाहरणार्थ, कमी गर्दीच्या ठिकाणी आपण एटीएमवर जाणे टाळावे. अशा एटीएममधून हे भामटे बऱ्याचदा आपल्या फसवण्याचाच फंडा राबवतात. जास्त गर्दी असलेले एटीएम निवडा.
यासह सीटीटीव्ही कॅमेरे बसविलेल्या एटीएममधूनच शक्यतो ट्रॅन्जेक्शन करा. कोणतीही फसवणूक झाल्यास, पुरावे म्हणून आपल्याला हे फुटेज महत्वाचे ठरतील. पैशांच्या व्यवहाराची पावती कोठेही टाकू नका. कारण यामध्ये छापलेली माहिती आपल्या विरूद्ध फसवणूकीसाठी वापरली जाऊ शकते.
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर