नात्याला काळिमा; नराधम मामाने ६ वर्षीय अल्पवयीन भाचीवर केला बलात्कार !

मामा भाचीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उल्हासनगरमध्ये घडली आली आहे. एका ६ वर्षाच्या भाचीवर नराधम मामानेच बलात्कार केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नराधम मामा हा शेजारी राहत असून त्याला दोन मुले आहेत. पीडित मुलीला त्यांच्यासोबत खेळण्याच्या बहाण्याने घरी घेऊन जात होता. त्यावेळी पीडितेवर वारंवार तिचा विनयभंग करून अत्याचार करत होता.

आई भाजी विक्रीचा व्यवसाय करत असल्याने पीडित मुलगी त्याच परिसरात राहणाऱ्या आपल्या मामाच्या घरी नेहमी खेळण्यास जात होती.

Advertisement

घरात कोणी नसल्याचा फायदा घेत नराधम मामा आपल्या सहा वर्षाच्या अल्पवयीन भाजीचे लैंगिक शोषण करत तिच्यावर बलात्कार करत होता.

धक्कादायक बाब म्हणजे तब्बल दोन महिने हा अत्याचार सुरू होता. ही बाब उघड झाल्यानंतर या प्रकरणी हिललाईन पोलिस स्टेशनमध्ये मुलीच्या कुटुंबाकडून आरोपी मामा विरोधात पोक्सा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तीन दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या मोठ्या भावाने तिच्यावर अत्याचार करताना पाहिले असता त्याने तत्काळ त्याच्या आईला घटनेची माहिती दिली पीडित मुलीच्या आईने हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.

Advertisement

आरोपीविरोधात भादंवि कलम ३७६ आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. गुरूवारी न्यायालयात हजर केले असता त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker