Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

धोनी अन‌् घोड्याची रेस…

0 0

MHLive24 टीम, 13 जून 2021 :-  कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी क्रिकेटच्या मैदानात सर्वश्रेष्ठ आहे. त्याने घराजवळच्या मैदानात आपल्या पोनी घोड्यासोबत रेस लावली आहे. या दोघांच्या रेसचा व्हिडीओ धाेनीची पत्नी साक्षीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. पोनीने याआधी श्वानांसोबत रेस लावली होती. आता त्याने खेळताना धोनीसोबत रेस लावली आहे. त्याला पराभूत करण्याचा चंग बांधला आहे.

आयपीएल स्थगित झाल्यानंतर कॅप्टन कूल धोनी आपल्या कुटुंबासोबत रांचीमधील घरी वेळ घालवत आहे. यावेळी त्याच्या घरी दोन नवीन पाहुणे आले आहेत. चेतक नावाचा घोडा आणि दुसरा पोनी नावाचा विदेशातून मागवलेल्या घोड्यासोबत धोनी खेळताना दिसत आहे. धोनीकडे श्वान देखील आहेत. त्यांच्यासोबत खेळतानाचे अनेक व्हिडीओ साक्षी धोनीने सोशल मीडियावर शेअर केले.

Advertisement

हा घोडा वेगासाठी नाही तर त्याच्या सौंदर्यासाठी ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी धोनीची मुलगी जीवा हिचा या घोड्याबरोबरचा फोटो शेअर करण्यात आला होता. या फोटोलाही चाहत्यांची खूप पसंती दिली. हा घोडा खास जीवासाठी गिफ्ट करण्यात आला आहे.

पोनी सध्या २ वर्षांचा आहे. जगातील सर्वात छोट्या जातीचा घोडा खास धोनीने स्कॉटलंड वरून मागवला आहे. स्कॉटलँडहून आयात झालेल्या या घोड्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपयांच्या घरात आहे. या घोड्याची उंची केवळ ३ फुटापर्यंतच वाढू शकते.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit