Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

देवेंद्रजी, योग्य कोण तुम्ही की पंतप्रधान नरेंद्र मोदी?

0

देवेंद्र फडणवीसजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारने कोविड 19 चा प्रसार रोखण्याकरिता केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मला आशा आहे की याची आपल्याला जाणीव असेल, अशी आठवण करून सणसणीत टोला लगावला.

तसंच, आता मुख्य प्रश्न असा आहे कि योग्य कोण, मानननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी की तुम्ही? असा सवाल करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी आणखी एक टोला लगावला.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फोन केला होता. यावेळी त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढा देत असताना राज्य सरकारने चांगल्या उपाययोजना केल्यात, असं म्हणत कौतुक केलं.

तर दुसरीकडे, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उजेडात येऊ न देणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे आणि त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता लढ्यात बाधा उत्पन्न होत आहे, असा आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

Advertisement

भाजपचंे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पंतप्रधान मोदी महाराष्ट्र सरकारचे कौतुक करतील, अशी शक्यताच फेटाळून लावली आहे.

मुंबई आणि महाराष्ट्राची कोविड नियंत्रणाची परिस्थिती वाईट असताना पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या कामगिरीबद्दल कौतुक केलं असेल असं मला वाटत नाही. हा प्रयत्न हास्यास्पद आणि केविलवाणा वाटतो!, असा दावाच दरेकर यांनी केला आहे.

Advertisement

😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news

Advertisement