लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाबाबत निर्णय घ्याः हायकोर्ट

MHLive24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- लसीकरण झालेल्यांना घरी बसायला लावू शकत नाही. त्यांच्याही अडचणी आहेत. सरकारने लसीकरण झालेल्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने सरकारला केली आहे.

लोकलने प्रवास करण्याची मुभा का नाही? :- उच्च न्यायालयात वकिलांना प्रवासाची परवानगी देण्याच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान ही सूचना केली. दरम्यान गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार असून या वेळी सर्वसामान्यांना प्रवास देण्यासंबंधी निर्णय़ होण्याची शक्यता आहे. लसीकरण झालेल्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा का देत नाही, असा सवाल न्यायालयाने केला.

वकिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्याच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. वकिलांच्या संघटनेकडून ही याचिका करण्यात आली. न्यायालयाचे प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे आणि वकिलांना न्यायालयात वेळेत पोहोचणे शक्य नाही त्यामुळे त्यांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली.

Advertisement

वकिलांच्या मागणीवर निर्णय :- वकिलांच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांकडून अंतिम निर्णय घेण्यात आल्याची माहिती या वेळी सरकारने दिली. सरकारने कोणत्या वकिलांना मुभा देता येईल, याचा आराखडा तयार असल्याचं सांगितलं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्वाक्षरी केलेली नाही अशी माहिती दिली.

दरम्यान, सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गेल्या वर्षीच्या तुलनेत वेगळी स्थिती आहे. त्यामुळे वकीलच नाही तर अन्य क्षेत्रांतील लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा उपलब्ध करण्याबाबत विचार करण्याची सूचना या वेळी केली.

गुरुवारी याप्रकरणी सुनावणी :- न्यायालयाने सगळ्याच क्षेत्रातील लसीकरण झालेल्यांचा विचार करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. लोकांना लोकलअभावी प्रवास करणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे त्यांचाही विचार करा असं न्यायालयाने सांगितल. गुरुवारी याप्रकरणी सुनावणी होणार आहे.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker