क्रेडिट कार्ड: सर्वाना माहिती असावी अशी फायद्याची अन महत्वाची माहिती

MHLive24 टीम, 13 जुलै 2021 :- जुन्या पिढीतील माणसे असा सल्ला देतात की अंथरूण पाहून पाय पसरावेत. याचा अर्थ असा आहे की आयुष्य चालवण्यासाठी उधारीचा आधार घेऊ नये. मात्र व्यवहारिकदृष्ट्या हे करणे अवघड असते. जसा काळ बदलत आहे तशा कर्ज घेण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत.

बँकांद्वारे आधी वैयक्तिक कर्ज मिळत होते, मात्र आता त्याच्यासोबतच विश्वासाच्या आधारावर बँकेने क्रेडिट कार्ड देण्यासही सुरुवात केली आहे. क्रेडिट कार्डचा वापर स्मार्ट पद्धतीने केला तर इतर पेमेंट पर्यायांपैकी ते सर्वात उपयुक्त साधन आहे. याचा वापर जबाबदारीने करावा लागतो.

Advertisement

रोज समंजसपणे क्रेडिट कार्ड वापरल्यास कॅशबॅक आणि रिवॉर्ड पॉंइंटचे फायदे मिळू शकतात. परंतु, त्यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्डबद्दल संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊयात याविषयी –

क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी / घेतल्यावर ह्या गोष्टी लक्षात घ्या 

Advertisement

पैसे येण्यापूर्वी होतात खर्च :- क्रेडिट कार्ड ही अशी सुविधा आहे की, तुमचे पैसे तुमच्या हातात येण्यापूर्वी खर्च होतात. अर्थात पैसे हातात नसले तरीही तुम्ही खर्च करू शकाल अशी प्रेरणा तुम्हाला क्रेडिट कार्डामधून मिळते. तुमच्या बँकेत कमी पैसे असतील, पण जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर, तुम्ही अगदी पैशांची चांगलीच उधळपट्टी करू शकता.

आपल्याकडे पैसे आहेत की, नाही हा विचार न करता तुम्ही आरामात क्रेडिट कार्डाच्या जीवावर एखादी वस्तू खरेदी करू शकता आणि करताही. त्यामुळे मग पगार येतो तेव्हा अर्ध्यापेक्षा अधिक पगार हा क्रेडिट कार्डावर खर्च करून घेतलेल्या वस्तूंचा इएमआय फेडण्यात जातो. त्यामुळे हातात पैसे नसतानाही पैशाची उधळपट्टी क्रेडिट कार्डामुळे होत असते हे मुळात लक्षात घ्यायला हवं.

Advertisement

ड्यू डेट फी :- तुम्ही क्रेडिट कार्डाचे बिल वेळेवर भरत असाल तर कोणतीही अडचण नाही. मात्र, दिलेल्या तारखेपर्यंत क्रेडिट कार्डाचे बिल न भरल्यास मोठी अडचण होऊ शकते. ड्यू डेट उलटून गेल्यानंतर पैसे भरायला गेल्यास त्यावर बराच दंड आकारला जातो. मासिक गणितावर दंडाची रक्कम ठरवली जाते. मात्र, वार्षिक गणिताच्या आधारे तुलना केल्यास तुमच्याकडून 30 टक्के दंड आकारला जातो.

डिजिटल वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याचा चार्ज :- अनेकदा आपण पेटीएम किंवा अन्य एखाद्या डिजिटल वॉलेटमध्ये पैसे भरण्यासाठी क्रेडिट कार्डाचा वापर करतो. मात्र, या व्यवहारासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाते.

Advertisement

पैसे काढल्यास चार्ज :- क्रेडिट कार्डामधून तुम्ही पैसे काढू शकता. मात्र, त्यासाठी प्रचंड व्याज आकारले जाते. त्यामुळे क्रेडिट कार्डातून मोठी रक्कम काढताना नेहमीच काळजी बाळगणे गरजेचे आहे.

क्रेडिटकार्ड कॅश ऍडव्हांस फीस :- क्रेडिट कार्डचा वापर एटीएम मधून पैसे काढण्य़ासाठी केल्यास बँकेकडून कॅश ऍडव्हांस शुल्क आकारले जाते. हे काढलेल्या रकमेच्या ३ टक्के असते. यावर मात्र कसल्या प्रकारचे व्याज आकारले जात नाही. तुम्ही हे दंड वेळेत भरले नाहीत तर, ते एकूण बिलात ग्राह्य धरले जातात. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर कॅश काढण्यासाठी करूच नये.

Advertisement

क्रेडिट कार्डवरील जीएसटी शुल्क :- प्रत्येक क्रेडिट कार्डवर १२ % जीएसटी कर आकारला जातो. यात व्याज शुल्क, सभासद शुल्क आणि कॅश शुल्क सामील असते. वेळेत बिल भरून तुम्ही हे अधिकचे शुल्क वाचवू शकता.

क्रेडिट कार्डवर परदेशी व्यवहार शुल्क :- आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी क्रेडिट कार्ड देणाऱ्या बॅंक नेहमी प्रोत्साहन देत असतात. ते करण्याआधी हे लक्षात घ्या की अशा व्यवहारावर अतिरिक्त शुल्क लावले जाते. व्यवहार केलेल्या रकमेचा काही भाग रूपयांमध्ये शुल्क म्हणून आकारला जातो.

Advertisement

क्रेडिट कार्ड बंद करण्यापूर्वी लक्षात ठवण्याच्या गोष्टी 

१) आपले देय देऊन टाका :- सर्व प्रथम आपण आपले जे क्रेडिट कार्ड बंद करीत आहात, प्रथम त्यावर काही थकबाकी आहे कि नाही ते पहा. ते असल्यास ते प्रथम ते देऊन टाका. थकबाकी ठेऊन आपण हे बंद करू शकत नाही. कोणत्याही शुल्कामुळे व्याज आणि उशीरा देय दिल्यास आपली क्रेडिट स्कोअर खराब होईल. जर क्रेडिट कार्डवर विद्यमान ईएमआय / कर्ज असेल तर आपण कार्ड बंद करण्यापूर्वी थकबाकीच्या वेळी अतिरिक्त शुल्क भरावे.

Advertisement

२) क्रेडिट यूटिलाइजेशन रेश्यो :- क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या वेळी क्रेडिट युटिलिझेशन रेश्यो (सीयूआर) बद्दल जाणून घेणे देखील महत्वाचे आहे. वास्तविक, एक उच्च सीयूआर आपल्या क्रेडिट स्कोअरला हानी पोहोचवू शकते. आपला सीयूआर 20-30% श्रेणीमध्ये असावा. तर आपले क्रेडिट कार्ड खाते बंद करण्यापूर्वी हे कार्य लक्षात ठेवा.

३) रिवॉर्ड पॉइंट्स :- क्रेडिट कार्ड खरेदी करताना आपल्याला काही पेबॅक गुण मिळतात. कोणतेही क्रेडिट कार्ड खाते बंद करण्यापूर्वी आपल्या जुन्या रिवॉर्ड पॉइंट्सची पूर्तता करण्यास विसरू नका. बर्‍याच क्रेडिट कार्ड कंपन्या क्रेडिट कार्डाद्वारे केलेल्या व्यवहारांवर बक्षीस गुण देतात, ज्यांचे कॅशबॅक, सवलत, कूपनद्वारे पूर्तता केली जाऊ शकते. आपले कार्ड बंद करण्यापूर्वी आपण याची पूर्तता केली असल्याचे सुनिश्चित करा.

Advertisement

४) बँकेकडून नो-ड्यूज प्रमाणपत्र घेणे विसरू नका :- जर आपण क्रेडिट कार्ड बंद करण्याची विनंती करत असाल तर लक्षात ठेवा की बऱ्याचदा बँक ते बंद करण्याच्या विनंतीनंतर उशीर करेल. यामुळे, आपण पाठपुरावा करत रहा. आपल्या बँकेशी संपर्क साधा आणि हे सुनिश्चित करा की क्रेडिट कार्ड बँकेने रद्द केले आहे आणि कार्डाद्वारे कोणतेही व्यवहार केले जात नाहीत. आपले नो-डीयूज प्रमाणपत्र बॅंकेकडून घेणे विसरू नका.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement