Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

एटीएम मधून फाटक्या नोटा आल्या? अशा बदलून मिळतील तुमच्या नोटा

0 508

MHLive24 टीम, 19 जुलै 2021 :- पैसे काढण्यासाठी आपण साहजिकच एटीएमचा वापर करतो. अनेक वेळा आपल्याला फाटक्या नोटा मिळाल्याचा अनुभव आला असेल. ATM मधून कॅश काढताना फाटलेल्या नोटा आल्यास काय करायला हवं? याबाबतची माहिती नसल्याने अनेक जण स्वत:चं नुकसानही करुन घेतात.

या फाटक्या नोटा बदलण्यासाठी एक प्रक्रिया आहे. अगदी सहज कोणत्याही प्रकारे अडचणींचा सामना न करता आपण बदलून घेऊ शकतो. ATM मधून कॅश काढल्यानंतर फाटलेल्या नोटा आल्या, तर काळजी करण्याची गरज नाही. या नोटा सहजपणे बदलता येऊ शकतात.

Advertisement

तसंच नोटा बदलून चांगल्या नोटाही घेता येऊ शकतात :- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, ATM मधून आलेल्या फाटलेल्या नोटा बँकतून बदलून दिल्या जातात आणि कोणतीही प्रायव्हेट किंवा सरकारी बँक असं करण्यापासून नकार देऊ शकत नाही.

कशी आहे ही प्रक्रिया ? 

Advertisement
  • बँकेत जाऊन एक फॉर्म घ्या, तुम्ही एटीएम मधून नोटा फाटक्या आल्या तर कोणता फॉर्म असतो याची माहिती बँकेतून मिळवू शकतो.
  • या फॉर्मवर तुम्ही कधी एटीएम मधून नोटा काढल्या, किती रुपये काढले, त्याचा सिरीयल नंबर, आणि इतर डिटेल्स भरावयाचे असतात.
  • या फॉर्मला सबमिट केल्यानंतर तुम्हाला नोटा बदलून मिळतात.
  • बँक अधिकारी देखील तुमच्याकडून अर्ज घेऊन काहीच वेळात नोटा बदलून देऊ शकतात. तुमची ट्रॅनजेक्शन स्लिप त्या अर्जासोबत जोडून तुम्हाला द्यावी लागेल.
  • आरबीआयने 2017 एक्स्चेंज करन्सी नियमानुसार तशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

पण आता बॅंकानी समजा नकार दिला तर काय ? असा प्रश्न येत असेल तर पुढे वाचा… :- बँकेमधून नोटा बदलण्यासाठी प्रक्रिया खूप सोपी आहे. जर एखादी बँक तुम्हाला यासाठी प्रतीक्षा करायला लावत असेल किंवा नोट बदलण्यास नकार देत असेल तर आपण पोलिसांत तक्रार करू शकता. त्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार असे करणार्‍या बँकांना दहा हजार रुपये दंड आकारला जाईल.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Advertisement