Cotton prices : कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चांदी; मिळाला 10 वर्षातील सर्वोच भाव

MHLive24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- शेतकरी राजाचे आर्थिक गणित हे त्याच्या पिकावर अवलंबून असते. ऊस, कापूस, कांदा हे नगदी पिके आहेत. शेतकरी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी या पिकांचा सहारा घेतात.(Cotton prices)

आता शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. परंतु दुसरीकडे सर्वसामान्यांसाठी झटका बसणारी बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव 10 वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांना भाव चांगला मिळेल. परंतु सामान्य माणसाला धक्का बसणार आहे. कारण सणापूर्वी कॉटनचे कपडे महाग होण्याची शक्यता आहे.

Advertisement

कापूस महाग का झाला?

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 6 टक्के कमी क्षेत्रात कापसाची पेरणी झाली आहे. अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन झाल्याने कापसाचे भाव वाढले आहेत. 2011 नंतर सरासरी 1 पौंड किमती झाल्या. भारतातही किमतीत 10 ते 12 टक्के वाढ झाली आहे.

सध्या कापसाची किंमत 6,500-7,000 रुपये प्रति क्विंटल आहे तर कापसाचा सरकारी भाव 5,725 रुपये प्रति क्विंटल आहे. त्याचबरोबर अमेरिकेत मुसळधार पावसामुळे कापसाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. चीनमध्ये कापसाला मोठी मागणी आहे, ज्यामुळे यार्न फायबरची मागणी मजबूत राहू शकते.

Advertisement

यार्न बनवणाऱ्या कंपन्यांना होणार फायदा

कापसाच्या भावात वाढ झाल्याचा फायदा यार्न उत्पादक कंपन्यांना होणार आहे. याच परिस्थितीमुळे टेक्सटाईल किंवा यार्न कंपन्यांच्या शेअरमध्येदेखील तेजी दिसून येते आहे. रेमंड्सच्या शेअरमध्ये १.७३ टक्के, स्पोर्टकिंग इंडियाच्या शेअरमध्ये ४.९९ टक्के, सियाराम सिल्कच्या शेअरमध्ये १.५७ टक्के तेजी दिसून आली आहे.

शेतकऱ्यांना नफा होईल

Advertisement

कापसाचे भाव वाढल्याचा फायदाही शेतकऱ्यांना मिळणार आहे. मंडईत कापसाची किंमत 6500 रुपये प्रति क्विंटलपेक्षा जास्त आहे. कापसाचा शासकीय भाव 5725 रुपये प्रति क्विंटल आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांना प्रति क्विंटल एक हजार रुपये अधिक मिळत आहेत.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker