भारतात कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली ‘ह्यांच्या’मुळे !

MHLive24 टीम, 6 जून 2021 :- भारतात कोरोनाचे संकट मागील दोन महिन्यात चांगलेच वाढले होते दुसऱ्या लाटेचा जोरदार तडाखा बसलेला असताना दूसरीकडे देशावर ऑक्सिजन आणि लसीच्या तुटवड्याचे दुसरे संकट देखील ओढावले होते.

भारतातील ह्या परिस्थितीबाबत अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनी आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या एकूण धोरणावर टीका केली होती.

Advertisement

मात्र आता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी सुद्धा भारतातील कोरोनाच्या परिस्थितीसाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याची भूमिका मांडली आहे.

या सर्वच बाबतीत एकूणच संभ्रमावस्थेत असलेल्या केंद्र सरकारने झालेल्या गोष्टींचे श्रेय घेण्यावरच लक्ष केंद्रीत केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आणि भारतात कोरोनाची ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे ते म्हणाले आहेत.

Advertisement

याआधी भारतातील कोरोना परिस्थितीवरून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. फौची यांनी देखील परखड भूमिका मांडली होती. त्यानंतर आता अमर्त्य सेन यांनी देखील केंद्र सरकारच्या कोरोनाविषयक धोरणावर ताशेरे ओढले आहेत.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement