Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

कोरोना इफेक्ट : स्मार्टफोन, त्याचे सेकंडहँड मार्केट आदींविषयी जाणून घ्या इंटरेस्टिंग फॅक्ट

0 0

MHLive24 टीम, 18 जून 2021 :- देशात स्मार्टफोनची विक्री झपाट्याने वाढली आहे आणि त्यासोबतच सेकंड-हँड स्मार्टफोनची विक्रीही वेगाने वाढली आहे. सेकंड-हँड स्मार्टफोनबद्दल पहिले तर, गेल्या वर्षात 2020 मध्ये, 26 टक्के स्मार्टफोन शाओमीने विकले आणि त्यामुळे सेकंड-हँड स्मार्टफोन बाजारात त्याने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

शाओमीनंतर Apple आयफोनने सेकंड हँडची विक्री सर्वाधिक केली. या बाजारात Apple चा 20 टक्के वाटा आहे, म्हणजेच 10 पैकी दोन स्मार्टफोन Apple चे विकत आहे. हा आकडा यूज्ड स्मार्टफोन मार्केटप्लेस कॅशिफाईने तयार केला आहे.

Advertisement

कोरोना साथीमुळे देशभरात लॉकडाउन लादण्यात आला. यामुळे, घरी काम करणे किंवा अभ्यास करणे आवश्यक असल्यामुळे स्मार्टफोनची मागणी वाढली. आपला स्मार्टफोन अपग्रेड करणे (3G जी ते 4G जी) ही काळाची गरज बनली आहे कारण ऑनलाइन वर्ग किंवा घरातून कार्य करण्यासाठी अॅपला सपोर्ट मिळल पाहिजे .

सेकंड हँड मार्केटमध्ये सॅमसंग नंतर Apple ची मागणी :- सेकंड हँड स्मार्टफोनच्या बाजाराच्या शेअर्सविषयी पहिले तर शाओमीने अजूनही 26 टक्के वर्चस्व राखले आहे. Apple 20 टक्क्यांसह दुसर्‍या स्थानावर आहे, सॅमसंग 16 टक्के सह तिसऱ्या स्थानावर आहे तर मोटोरोला आणि व्हिवो 6-6 टक्के सह चौथ्या स्थानी आहे.

Advertisement

या सर्वेक्षणात दिल्लीतील 23 टक्के, मुंबईतील 13 टक्के, बंगळुरूमधील 11 टक्के आणि हैदराबादमधील 7 टक्के लोकांचा समावेश आहे. गाझियाबाद, फरीदाबाद, अहमदाबाद आणि लखनऊसारख्या सैटेलाइट शहरांनीही वाढ दर्शविली आणि अपकमिंग सिटी कैटेगरी प्रकारात प्रथम स्थान मिळविले.

केवळ 20% महिलांनी त्यांचे स्मार्टफोन विकले :- सर्वेक्षणातून मिळालेल्या इनसाइट्सनुसार मागील वर्ष 2020 मध्ये लोकांनी आपला सेकंड हँड स्मार्टफोन सरासरी 4217 रुपयांना विकला. बहुतेक यूजर्स असे होते की ज्यांनी स्मार्टफोनची विक्री जवळजवळ तीन वर्षे नांतर केली होती.

Advertisement

62 टक्के लोकांना स्क्रीनशी संबंधित आणि 21 टक्के लोकांना बॅटरी संबंधित इशू होते. या सर्वेक्षणानुसार स्मार्टफोन विक्री करणाऱ्यांपैकी 80 टक्के पुरुष होते तर केवळ 20 टक्के महिलांनी स्मार्टफोन विकले.

या सर्वेक्षणात सुमारे 4 हजार लोकांकडून प्रतिक्रिया घेण्यात आली. सर्वेक्षणानुसार, बहुतेक भारतीयांनी लॅपटॉपऐवजी स्मार्टफोन खरेदी करण्यास प्राधान्य दिले. याशिवाय, स्मार्टफोन खरेदीनंतर 14-18 महिन्यांच्या आत 84 टक्के लोकांनी ते अपग्रेड केले.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement