Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

व्यावसायिक डुक्कर पालन: जाणून घ्या संपूर्ण मार्गदर्शन

0 9

MHLive24 टीम, 10 जुलै 2021 :- गाई, म्हशींच्या संगोपनापेक्षा डुक्कर पालन बरेच स्वस्त आहे. त्यातून नफा अधिक आहे. त्याचे मांस खूप पौष्टिक असते. यामुळेच त्याची मागणी केवळ देशातच नाही तर परदेशात देखील आहे. पाच ते सहा महिन्यांत डुक्कर पालनाचा खर्च निघाल्यानंतर तुम्ही चांगले उत्पन्न मिळवण्यास सुरुवात करता.

चीन, रशिया, अमेरिका, ब्राझील आणि जर्मनीमध्ये डुकरांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. भारतात, उत्तर प्रदेश, आसाम, बिहार, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, ओरिसा इत्यादी राज्यात डुकरांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु व्यावसायिक डुक्कर पालन आता कमी झाले आहे. तर चला जाणून घेऊया व्यावसायिक डुक्कर पालन बद्दल संपूर्ण माहिती.

Advertisement

वराह पालनामध्ये सुद्धा शेळीप्रमाणे तीन प्रकार अवलंबिले जातात. खुली पद्धत, अर्धबंदिस्त पद्धत आणि बंदिस्त पद्धत. दुसरी गोष्ट म्हणजे स्थानिक जातीची आणि आपल्याकडे परंपरागतरित्या पाळली जाणारी डुकरे मोकळ्यावरची हवा सहन करू शकतात. मात्र आपण संकरित किंवा प्रगत जातीची डुकरे पाळली असतील तर ती या हवेला टिकाव धरत नाहीत. डुकरांमध्ये मरतुक मोठ्या प्रमाणावर असते आणि हवेच्या बाबतीत दक्षता घेतली नाही तर ही मरतुक वाढून नुकसान होण्याचा संभव असतो.

निरनिराळ्या वयाच्या डुकरांना निरनिराळे खाद्य द्यावी लागते आणि हे कसोशीने करण्यासाठी निरनिराळ्या वयाची डुकरे वेगवेगळ्या ठिकाणी डांबावी लागतात. बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त पद्धतीमध्ये असे करणे शक्य होते. असे केल्याने वाढत्या वयातील पिलांमध्ये मरण्याचे प्रमाण कमी होते. बंदिस्त पद्धतीमध्ये वराह पूर्णपणे बंदिस्त असतात आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र खोल्या आधुनिक पद्धतीने बांधून द्याव्या लागतात. आधुनिक पद्धतीमध्ये वराह पालन करण्यास खर्चही होतो. परंतु पैदास आणि निरोगीपणा या गोष्टी पूर्णपणे सांभाळता येतात.

Advertisement

वराह पालन हा व्यवसाय जसा शेतकर्‍यांचा पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जातो, तसाच तो स्वतंत्र व्यवसाय म्हणून सुद्धा ओळखला जातो. काही लोक तर डुकराला अपवित्र समजत असतात. मात्र भारताच्या ईशान्य भागातील आसाम, मेघालय, त्रिपुरा, नागालॅन्ड, अरुणाचल, मणिपूर आणि मिझोराम या भागात राहणार्‍या आदिवासी लोकांच्या आहारामध्ये डुकराचे मांस मोठ्या प्रमाणावर समाविष्ट असते.

म्हणजे भारताच्या काही भागांमध्ये तुरळक प्रमाणात तर ईशान्य भारतात मोठ्या प्रमाणात डुकराच्या मासांचे मार्केट आहे. चीन, अमेरिका, रशिया, ब्राझील अशा देशांमध्ये डुकरांचे मांस मोठ्या प्रमाणावर भक्षण केले जाते. म्हणजेच डुकराच्या मांसाला परदेशात निर्यातीची चांगली संधी आहे.

Advertisement

मांसासाठी वराहपालन करण्यासाठी पैदास्क्षम जनावरांची निवड करावी लागते. त्यासाठी खालीलप्रमाणे काही तत्वे लक्षात घेऊन निवड करावी.

१] जनावरांचा सर्वसाधारण शरीरबांधा व जात यामध्ये आखूड पायाची, चरबीयुक्त, काहीसा छोटा मजबूत शरीरबांधा व लवकरात लवकर प्रजनन होणारी जात यांचा समावेश होतो. दुसरा प्रकार म्हणजे लांबट शरीरबांधा असनारी लांब पायांची लांब पसरट पाठ असणारी जनावरे यांचा समावेश होतो.

Advertisement

२] वजन आणि वय :- वराहाचे वय व शारीरिक पडताळणी करतांना खालीलप्रमाणे सरासरी असावी.

वय सरासरी वजन

Advertisement

१ ते ७ दिवस १ ते १.५ किलोग्राम
७ ते २१ दिवस २.५ किलोग्राम
९० ते १२० दिवस ४० ते ४५ किलोग्राम
७ महिने ८० – ९० किलोग्राम
१० महिने १०० किलोग्राम

३] आकर्षक मोबदला देणारे शरीराची भागाची वाढ :- वराह पासून मिळणाऱ्या मासाचा विचार करता पाठीचे, मांडीच्या मासास अधिक किंमत मिळते. त्यामुळे पैदासक्षम जनावरांची निवड करताना ती लट्ठ असण्यापेक्षा लुसलुशीत पाठ, मांड्या, पुठ्ठे असणाऱ्या जनावरांना निवडीमध्ये प्राधान्य द्यावे.

Advertisement

४] जनावरांचे पाय मध्यम लांबीचे सरळ व एकमेकांपासून पुरेसे अंतर असणारे असावे. अंगावरील कातडी व केस मउ मुलायम असावेत. मध्यम आकाराची हाडे, सफाईदार खांदे असणाऱ्या जनावरांना प्राधान्य द्यावे.

५] पैदाशीसाठी निवडलेल्या माद्यांना कमीत कमी बारा स्तन असावेत. कासेची रचना व आकार याचाही विचार व्हावा. मुके सड असणारी, सडामध्ये व्यंग असणाणारी जनावरे पैदाशीसाठी वापरू नयेत.

Advertisement

६] उच्च प्रतीची अनुवांशिकता, निवडलेली उत्तम वंशावळीचा वारसा असलेली व आरोग्य संपन्न असावीत. ज्याकडून ही जनावरे खरेदी करावयाची आहेत त्यांच्या बाबत पुरेशी विश्वासार्हता व सचोटी असणे नेहमीच लाभदायक ठरते.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement