Children will get pension : आई-वडिलांनंतर मुलांना मिळणार पेन्शनचा लाभ? कधी आणि कशी मिळेल रक्कम? जाणून घ्या

MHLive24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- समाजात अनेकदा विविध दुर्घटना होत असतात. या दुर्घटनेमुळे बऱ्याचवेळा लहान वयातच मुले अनाथ होतात. अशा वेळी प्रत्येकाला आपल्या मुलाचे भविष्य सिक्युअर असावे असे वाटते.(Children will get pension )

जर तुम्हाला देखील तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर तुम्ही कर्मचारी पेन्शन योजना नक्कीच घेतली पाहिजे.

ही योजना फक्त EPFO मार्फत घेतली जाते. यामध्ये नोकरी करणारे आई किंवा वडील किंवा दोघेही याचे सदस्यत्व घेऊ शकतात.

Advertisement

या योजनेनुसार, जर तुमच्या नोकरीला 10 वर्षे पूर्ण झाली असतील तर तुम्ही कर्मचारी पेन्शन योजनेसाठी पात्र बनता. यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या अनाथ मुलांना याचा थेट फायदा मिळतो.

कर्मचारी पेन्शन योजना काय आहे ? – EPFO पेन्शन योजना म्हणजे EPS मध्ये पैसे जमा करण्यासाठी, कंपनी आपल्या कर्मचार्‍यांच्या पगारातून पैसे कापत नाही, तर कंपनीच्या योगदानाचा काही भाग EPS मध्ये जमा होतो.

अशा परिस्थितीत जेव्हा कुटुंबातील कर्मचारी सदस्याचा मृत्यू होतो. त्यावेळी त्यांच्या अनाथ मुलांना पेन्शन मिळते. EPS योजनेंतर्गत अनाथ मुलांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे प्रदान केलेल्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया.

Advertisement

EPS अंतर्गत मुलांसाठी लाभ – या योजनेत अनाथ मुलांना सरकारकडून पेन्शन मिळते. ते विधवा निवृत्ती वेतनाच्या 75% आहे. या योजनेअंतर्गत अनाथ मुलांना दरमहा किमान 750 रुपये मिळतात. दुसरीकडे, जर दोन मुले असतील तर दोन्ही अनाथ मुलांना दरमहा 750-750 रुपये पेन्शन मिळेल. या योजनेचा लाभ अनाथ बालकांच्या वयाच्या 25 वर्षापर्यंत मिळू शकतो. यासोबतच दिव्यांग मुलाला आजीवन पेन्शन दिली जाते.

पेन्शनचे पैसे कसे मिळवायचे? – EPS साठी, कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून एकही पैसा कापत नाही. उलट, कंपनी स्वतःच्या वतीने हे योगदान ईपीएसमध्ये ठेवते. EPFO च्या नवीन नियमांनुसार ज्या लोकांचा मूळ पगार 15 हजार रुपयांपेक्षा कमी असेल.

त्यांना ईपीएस योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याच वेळी, तुमच्या पगाराच्या एकूण 8.33 टक्के रक्कम ईपीएसमध्ये जमा केली जाते. यानुसार, 15,000 रुपये मूळ वेतन मिळाल्यावर प्रत्येक महिन्याला 1250 रुपये EPS मध्ये जमा होतात.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker