Cheap samsung smartphone: सॅमसंगने सादर केला स्वस्त, सुंदर आणि टिकाऊ स्मार्टफोन,जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

MHLive24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- सध्या स्मार्टफोनचा जमाना आहे. अनेक लोक मोबाईल वापरतात. प्रत्येकाची मोबाइलबद्दलची अपेक्षा वेगवेगळी असते. आता या सर्वांच्या अपेक्षा पूर्ती होईल असाच एक फोन Galaxy A03 एंट्री-लेव्हल फोनची Samsung ने आज घोषणा केली.(Cheap samsung smartphone)

फोनची खासियत म्हणजे त्याची बॅटरी लाइफ. Galaxy A03 मध्ये 5000mAH ची मजबूत बॅटरी आहे, जी दीर्घकाळ टिकेल. या खासियत व्यतिरिक्त, आणखी काही फीचर्स आहेत जे लक्षवेढी ठरत आहेत.

उदाहरणार्थ, Galaxy A03 मध्ये 6.5-इंच वॉटरड्रॉप फुल स्क्रीन आहे. प्रोडक्ट मध्ये एक प्लास्टिकचे बॅक कव्हर देखील वापरले जाते, जे काळा, लाल आणि निळा या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. चला जाणून घेऊया Samsung Galaxy A03 चे फीचर्स…

Advertisement

Samsung Galaxy A03 चे स्पेसिफिकेशन्स

हार्डवेअरबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये 1.6GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर वापरण्यात आला आहे. दुर्दैवाने, मॉडेल अजून घोषित केले गेले नाही. मागील लीकवरून असे दिसून आले आहे की ते 3+32GB, 4+64GB आणि 4+128GB च्या तीन स्टोरेज क्षमता ऑफर करेल.

Samsung Galaxy A03 Camera

Advertisement

Samsung Galaxy A03 मध्ये 5MP फ्रंट कॅमेरा आहे. मागील कॅमेरामध्ये 48MP मुख्य सेन्सर तसेच 2MP डेप्थ-ऑफ-फील्ड लेन्सचा समावेश आहे. हे फ्लॅशसह येते. प्राथमिक सेन्सरमध्ये f/1.8 अपर्चर आहे; सेकेंडरी सेन्सरमध्ये f/2.4 अपर्चर आहे; फ्रंट-माउंट कॅमेरा f/2.2 अपर्चर सह येतो.

Samsung Galaxy A03 इतर फीचर्स

हा फोन डॉल्बी साउंड इफेक्टला सपोर्ट करतो. Samsung Galaxy A03 मध्ये एक अनोखा कॅमेरा हाऊसिंग आहे आणि मागील पॅनलवर फायबर सारखी फिनिश आहे. फोनची डाइमेंशन 164.2 x 75.9 x 9.1 मिमी आहेत. याचा सरळ अर्थ असा की Galaxy A03 Galaxy A02 सारखाच आहे.

Advertisement

Samsung Galaxy A03 किंमत

भविष्यात त्याची विक्री परदेशात होण्याची शक्यता आहे. सध्या कोणतीही विशिष्ट अशी लॉन्च तारीख उपलब्ध नाही. पण अंदाजानुसार हॉलिडे शॉपिंग सीजनमध्ये हा फोन बाजारात उतरणार आहे. रंग आणि मेमरी वेरिएंट वेगवेगळ्या मार्केटमध्ये भिन्न असतील. किंमत अद्याप जाहीर केलेली नाही.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker