Small Savings Scheme : व्याजदरात बदल ? जाणून घ्या PPF, सुकन्या समृद्धी योजनेसह सर्व बचत योजनांमध्ये असलेले व्याजदर…

MHLive24 टीम, 01 जानेवारी 2022 :- सरकारने पीपीएफ, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि सुकन्या समृद्धी योजनेसह लहान बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. सध्या PPF वर ७.१ टक्के व्याज मिळत आहे.(Small Savings Scheme)

जानेवारी ते मार्च २०२२ पर्यंत लहान बचत योजनांमध्ये उपलब्ध असलेले जुने व्याजदर कायम राहतील. सरकार दर तिमाहीत अल्पबचत योजनेच्या व्याजदरांचा आढावा घेत, त्यात बदल करत असते .

प्रत्येक तिमाहीत व्याजदरांचे पुनरावलोकन केले जाते

Advertisement

PPF, ज्येष्ठ नागरिक योजना आणि सुकन्या समृद्धी योजनेसह सर्व लहान बचत योजनांवरील व्याजदरांमध्ये बदल करण्यात आलेला नाही. हे दर ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 पर्यंतच्या दरांप्रमाणेच राहतील.

पीपीएफवरील व्याज दर 7.1 टक्के आहे, तर ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याज दर 7.4 टक्के आहे. सुकन्या समृद्धी योजनेत जमा केलेल्या रकमेवर ७.६ टक्के व्याज मिळत आहे.

पाच वर्षांच्या मासिक उत्पन्न खाते योजनेत ६.६ टक्के व्याज मिळते, तर पाच वर्षांच्या NSC मध्ये वार्षिक ६.८ टक्के व्याज मिळते. एक वर्षाच्या ठेवीवर 5.5 टक्के तर पाच वर्षांच्या ठेवीवर 6.7 टक्के व्याजदर आहे.

Advertisement

पोस्ट ऑफिसचे दर बँक एफडीपेक्षा जास्त आहेत

पोस्ट ऑफिस बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल न झाल्याने स्थिर उत्पन्न गुंतवणूकदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. पोस्ट ऑफिस बचत योजनेचे दर बँकेच्या एफडी दरापेक्षा जास्त ठेवले जात आहेत. सध्या बहुतांश बँका एक वर्ष ते दहा वर्षांपर्यंतच्या ठेवींवर केवळ ५ ते ५.५ टक्के व्याज देत आहेत.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker