Important news: पगारवाढीच्या आनंदाला ग्रहण! तुमची सॅलरी स्लिप बदलणार, जाणून घ्या काय आहे सरकारचा प्लॅन?

MHLive24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- कोरोना महामारीच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकनाच्या पगारात कपात झाली. परंतु दुसऱ्या लाटेनंतर मात्र परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागल्याने कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली आहे. पण तुमच्या या पगार वाढीच्या आनंदाला ग्रहण लागू शकते.(Important news)

पगार वाढल्यानंतर तुमचा टेक होम पगार वाढला असेल तर मात्र तुमच्यासाठी एक कामाची बातमी आहे. नवीन वेतन संहिता लागू झाल्यानंतर, तुमचा टेक होम पगार कमी होऊन तुमच्यावरील कराचा बोजा वाढू शकतो.

भत्त्यांमध्ये कपात होईल

Advertisement

कर्मचाऱ्याच्या कॉस्ट-टू-कंपनीमध्ये (CTC) तीन ते चार घटक असतात. मूळ पगार, घरभाडे भत्ता (HRA), पीएफ, ग्रॅच्युइटी आणि पेन्शन सारखे सेवानिवृत्तीचे फायदे आणि एलटीए सारखे कर बचत भत्ते आणि मनोरंजन भत्ता आदी.

आता नवीन वेतन संहितेत असे ठरवण्यात आले आहे की भत्ते कोणत्याही किंमतीत एकूण पगाराच्या 50% पेक्षा जास्त असू शकत नाहीत. उदा. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार दरमहा 50,000 रु. असेल तर त्याचे मूळ वेतन 25000 रुपये आणि त्याचे भत्ते उर्वरित 25000 रुपयांमध्येच आले पाहिजेत.

म्हणजेच आतापर्यंत ज्या कंपन्या मूळ वेतन 25-30 टक्के ठेवत असत आणि उर्वरित भाग भत्त्याचा होता, त्यांना आता मूळ वेतन 50 टक्क्यांपेक्षा कमी ठेवता येणार नाही. अशा परिस्थितीत नवीन वेतन संहितेचे नियम लागू करण्यासाठी कंपन्यांना अनेक भत्तेही कमी करावे लागतील.

Advertisement

निवृत्तीसाठी अधिक पैसे गोळा करतील

भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटी कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनाशी थेट जोडलेले आहेत. साहजिकच मूळ वेतनात वाढ झाल्याने या दोन घटकांचे योगदानही वाढणार आहे. म्हणजेच, कर्मचाऱ्याचा निवृत्ती निधी वाढेल पण त्याच्या हातात असलेला पगार कमी होईल, कारण आता मोठा हिस्सा पीएफ आणि ग्रॅच्युइटीकडे जाऊ लागेल. हे एका उदाहरणाने समजून घेऊ

समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार एक लाख रुपये आहे. त्यांचे मूळ वेतन 30,000 रुपये आहे. पीएफमध्ये कर्मचारी आणि कंपनी दोघेही 12-12 टक्के योगदान देतात. म्हणजेच दोघेही 3600 रुपयांचे योगदान देतात.

Advertisement

त्यामुळे कर्मचार्‍यांचा मासिक पगार 92800 रुपये होता. पण जेव्हा मूळ वेतन 50,000 रुपयांपर्यंत वाढेल, तेव्हा हातातील पगार 88000 रुपये होईल, म्हणजेच संपूर्ण 4800 रुपये दरमहा कमी होतील. त्याचप्रमाणे ग्रॅच्युइटीच्या रकमेतही वाढ होणार आहे.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker