SBI’s rule change : स्टेट बँकेच्या ‘त्या’ नियमात पुन्हा बदल; ट्रॅन्जेक्शन करण्याआधी नक्कीच जाणून घ्या अन्यथा येईल अडचण

MHLive24 टीम, 19 डिसेंबर 2021 :- देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI च्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. SBI ने ग्राहकांच्या सुरक्षेसाठी बँक नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत.(SBI’s rule change)

या बदलांतर्गत, आता ग्राहक फक्त त्याच फोनवरून SBI च्या YONO अॅप्लिकेशनमध्ये लॉग इन करू शकतात जो मोबाइल नंबर बँकेत रजिस्टर असेल.

म्हणजेच आता तुम्ही कोणत्याही क्रमांकावरून बँकेसंदर्भातील सुविधा घेऊ शकत नाही. ऑनलाइन बँकिंग फसवणुकीपासून ग्राहकांना वाचवता यावे यासाठी बँकेने हे पाऊल उचलले आहे.

Advertisement

ऑनलाइन बँकिंग फसवणुकीपासून संरक्षण

SBI आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी सुविधा सादर करत असते. ऑनलाइन फसवणुकीचे वाढते प्रकरण लक्षात घेता, योनो अॅपमध्ये हे नवीन अपग्रेड समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे, ग्राहकांना सुरक्षित बँकिंग अनुभव मिळेल तसेच ते ऑनलाइन फसवणुकीला बळी पडणार नाहीत.

बँकेनेच माहिती दिली

Advertisement

बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे की, नवीन रजिस्ट्रेशन साठी ग्राहकांनी तोच फोन वापरावा ज्यामध्ये त्यांचा मोबाईल क्रमांक बँकेकडे नोंदणीकृत आहे. म्हणजेच, आता SBI YONO खातेधारकांना इतर कोणत्याही क्रमांकाने लॉग इन करण्याचा प्रयत्न केल्यास कोणतेही व्यवहार करण्याची परवानगी देणार नाही.

फोन नंबरसाठीही नियम बनवले आहेत

आता या नवीन नियमानुसार, तुम्ही कोणत्याही फोनद्वारे अॅपमध्ये लॉग इन करू शकत नाही, पूर्वीचे ग्राहक कोणत्याही फोनवरून लॉग इन करू शकत होते. आता तुम्ही YONO ची सुविधा त्याच मोबाईलवरून वापरू शकता ज्यामध्ये तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर राहील. याद्वारे ग्राहकांसाठी सुरक्षा वाढवण्याचा प्रयत्न असेल असे बँकेने म्हटले आहे.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker