ATM आणि क्रेडिट कार्डच्या नियमात 1 जानेवारीपासून होतोय ‘हा’ बदल; जाणून घ्या, अन्यथा नववर्षात होईल नुकसान

MHLive24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- सध्या ऑनलाइनचा जमाना आहे. सगळे व्यवहार ऑनलाईन होत असतात. परंतु यात फ्रॉडींगचे प्रमाण वाढले. परंतु आता ही ऑनलाईन फसवणूक टाळता येणार आहे. रिझर्व्ह बँकेने याबाबत निर्णय घेतला आहे. एक जानेवारीपासून नवीन नियम लागू होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डेटा स्टोरेजशी संबंधित टोकनाइजेशनचे नियम जारी करण्यात आलेत. ( Change in ATM and credit card rules )

यानुसार ग्राहकांना आपल्या कार्डची माहिती फूड डिलिव्हरी अॅप, कॅब सेवा देणाऱ्या कंपन्या अशा कोणत्याही थर्ड पार्टी अॅपसोबत शेअर करता येणार नाही. याआधी अॅपमध्ये माहिती स्टोअर केली जात होती, मात्र यामुळे माहितीच्या चोरीचा धोका राहतो. म्हणून नवा नियम लागू होणार आहे. यात ग्राहकांना आपला डेटा शेअर करायचा की नाही याचं स्वातंत्र्य असेल.

आरबीआयच्या (RBI) नव्या नियमांनुसार 1 जानेवारी 2022 पासून कार्ड देणारी बँक आणि कार्ड नेटवर्क वगळता कुणालाही कार्डची माहिती स्टोअर करता येणार नाही. याआधी स्टोअर केलेल्या डेटालाही फिल्टर केलं जाणार आहे. असं असलं तरी ट्रांजेक्शन ट्रॅकिंग किंवा इतर मूलभूत सोयींसाठी संस्था काही मर्यादित माहिती स्टोअर करु शकतात. यात कार्ड नंबर आणि कार्डधारकाच्या नावाचे शेवटचे 4 अंक स्टोअर करण्याची सूट असेल.

Advertisement

सर्व युटिलिटी पेमेंटवर ऑटो डेबिट बंद केले जाणार :- अनेक ई-कॉमर्स कंपन्यांनी त्यांचे स्वतःचे पेमेंट एग्रीगेटर प्लॅटफॉर्म सुरू केले, जिथून ग्राहकांना प्रवेशयोग्य पेमेंट इंटरफेसचा अनुभव दिला जाऊ शकतो. 1 ऑक्टोबरपासून तुमच्या डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या ऑटो डेबिटवर अतिरिक्त घटक प्रमाणीकरणाचे नियम लागू होतील. यामध्ये वेगवेगळ्या पेमेंटसाठी ग्राहकाची मान्यता आवश्यक असेल म्हणजेच अनेक युटिलिटी पेमेंटवर ऑटो डेबिट बंद केले जाणार आहे.

‘कार्ड टोकनायझेशन’ काय आहे ते समजून घ्या :- जर तुम्ही ई-कॉमर्स वेबसाईट वरून खरेदी केली असेल आणि पेमेंट करताना फक्त सीव्हीव्ही नंबर एंटर केला असेल तर याचा अर्थ असा की ई-कॉमर्स वेबसाइटवर तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डबद्दल आधीच संपूर्ण माहिती आहे. पण आता ते होणार नाही. ई-कॉमर्स वेबसाइट तुमच्या कार्डाची माहिती साठवू शकत नाहीत. त्याऐवजी, पेमेंट ‘टोकन सिस्टीम’ द्वारे केले जाईल.

सोप्या भाषेत समजून घ्या- टोकनलायझेशनमध्ये तुम्हाला तुमचे कार्ड तपशील एंटर करण्याची गरज नाही, त्याऐवजी ‘टोकन’ नावाचा एक यूनीक ऑल्टरनेट नंबर आहे, जो तुमच्या कार्डाशी जोडलेला आहे. ज्याचा वापर करून तुमचे कार्ड तपशील सुरक्षित राहतात. याचा अर्थ जेव्हा तुम्ही अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाइटवर खरेदी केल्यानंतर पेमेंट करता, तेव्हा तुम्हाला तुमचा 16 अंकी कार्ड क्रमांक टाकावा लागणार नाही, त्याऐवजी तुम्हाला टोकन क्रमांक टाकावा लागेल.

Advertisement

हा चार्ज वाढणार :- निश्चित ठरलेल्या वेळेपेक्षा अधिकदा बँकांच्या एटीएममधून पैसे काढल्यास 1 जानेवारी 2022 पासून नवी शुल्क आकारणी होईल. भारतीय रिजर्व्ह बँकेने (RBI) फ्री लिमिटपेक्षा अधिकवेळा एटीएममधून पैसे काढल्यास आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ करण्याची परवानगी बँकांना दिलीय. लिमिटपेक्षा अधिकवेळा पैसे काढल्यास 21 रुपये द्यावे लागणार आहेत.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker