Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

‘या’ नेत्याची नाराजी दूर करण्यासाठी चंद्रकांतदादा त्यांच्या घरी

0 361

MHLive24 टीम, 22 जुलै 2021 :- केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. तसंच ओबीसी आरक्षणाच्या बैठकीतही त्या गैरहजर होत्या. त्यामुळे त्यांच्या नाराजीवर उघड चर्चा झाली.

त्यातच नरेंद्र मोदी व अमित शाह हेच आपले नेते आहेत, असे सांगताना त्यांनी राज्याच्या नेत्यांवर अविश्वास दाखविला. या पार्श्वभमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा यांची भेट घेतल्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचं आता बोललं जात आहे.

Advertisement

भाजपवर टीका :- केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडे यांची नाराजी प्रकर्षाने समोर आली होती. त्यानंतर आपल्या समर्थकांशी संवाद साधताना पंकजा यांनी भावनिक आवाहन करत राजीनामे परत घेण्यास सांगितलं होतं; मात्र भाजपचे सरकार आल्यावरच आपल्याबाबत वेगवेगळी माहिती का पसरविली जाते, असा सवाल करीत त्यांनी भाजपवर टीका केली होती.

भेटलो यात बातमी काय ? :- एकाच पक्षातील दोन नेत्यांची भेट होणं स्वाभाविक आहे. यात वेगळं असं काहीच नाही. त्याचबरोबर ही भेट गुप्त नाही, तर उघडपणे सर्वांसमोर झाली. आम्ही दोघे भेटलो यात बातमी काय? अशी प्रतिक्रिया पाटील यांनी पंकजा यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर दिली आहे.

Advertisement

पंकजा म्हणाल्या, ‘माझे नेते मोदी-शाहा’ :- पंकजा मुंडे समर्थकांनी राजीनाम्याचं सत्र सुरू केलं. त्यानंतर पंकजा यांनी दिल्ली वारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची पंकजांनी भेट घेतली.

त्यानंतर वरळीत पत्रकार परिषद घेत “माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत. आम्ही कुणाला घाबरत नाही. मी कुणाचा अनादर करत नाही,” असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधल्याची चर्चा होती.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement