Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

देशभरातील ‘ह्या’ राज्यांमध्ये पेट्रोलने केलय शतक ! डिझेल देखील लवकरच शतक गाठणार

0

MHLive24 टीम, 7 जून 2021 :- आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा कायम ठेवला आहे. रविवारी देखील इंधनाच्या दरात वाढ केल्याने देशातील सहा राज्यांमध्ये पेट्रोलच्या किमती प्रति लिटर १०० रुपयांवर पोहोचल्या आहेत. त्याचबरोबर डिझेलही अनेक ठिकाणी आता प्रति लिटर १०० रुपयांसमीप आले आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी इंधनाच्या दराचा आढावा घेताना पेट्रोलच्या दरात प्रति लीटर २१ पैसै, तर डिझेल २० पैशांनी वाढ केली. ४ मेपासून आतापर्यंत कंपन्यांकडून तब्बल २० वेळा इंधन दरवाढ करण्यात आली आहे.

Advertisement

परिणामी, महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगाना आणि लद्दाख या सहा राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोल १०० रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल ९५.०९ रुपये प्रति लीटर, तर डिझेल ८६.०१ रुपये इतके झाले आहे. तर मुंबईत पेट्रोल प्रति लीटर १०१.३ रुपये, तर डिझेल ९३.३५ रुपयांवर पोहोचले आहे.

४ मेपासून आतापर्यंत पेट्रोल ४.६९ रुपये, तर डिझेल ५.२८ रुपये प्रति लीटर इतकी वाढ झाली आहे. दरम्यान, डिझेलही अनेक राज्यांमध्ये १०० रुपये प्रति लीटरच्या जवळ पोहोचले आहे. पेट्रोल पाठोपाठ डिझेल देखील लवकरच शतक गाठणार असल्याचा अंदाज वर्तवली जात आहे.

Advertisement

इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने येत्या काळात महागाईत देखील वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. डिझेलच्या किमती भडकल्या असल्याने फळे, भाज्या, अन्नधान्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींतही वाढ होताना दिसत आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement