एका दिवसात वापरू शकता 365 जीबी डेटा; कॉलिंग आणि एसएमएस देखील वर्षभर फ्री जाणून घ्या ‘हे’ चार प्लॅन्स

MHLive24 टीम, 12 जुलै 2021 :- सध्या देशातील दूरसंचार कंपन्यांमध्ये आपले ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी आणि नवीन ग्राहक जोडण्यासाठी बरीच स्पर्धा सुरू आहे. दूरसंचार कंपन्यांवर ग्राहकांची संख्या वाढवण्याचा दबाव आहे. म्हणूनच कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक से बढकर एक चांगली रिचार्ज योजना ऑफर करतात.

ह्या सर्व योजना वापरताना बर्‍याच वेळा असे घडते की आपलं मध्ये उपलब्ध असलेला दैनिक डेटा अशा वेळी समाप्त होतो की आपली मोठ्या गोष्टी त्यावाचून अडकतात. यासाठी आपल्याला आवश्यक आहे नो डेली डेटा लिमिट प्लॅन.

Advertisement

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशा काही प्लॅन्स बद्दल सांगणार आहोत ज्यात तुम्ही एका दिवसात 365 जीबी डेटा वापरू शकता आणि तेही कोणत्याही निर्बंधाशिवाय. यासह, तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आदी सुविधा देखील मिळतील. जाणून घेऊयात नो डेली डेटा लिमिट प्लॅन.

247 रुपयांचा प्लॅन :- या योजनेची वैधता 30 दिवसांची असून त्यामध्ये एकूण 25 जीबी डेटा देण्यात येत आहे. हाय स्पीड डेटा संपल्यानंतर आपण 64 केबीपीएसच्या वेगाने इंटरनेट वापरू शकता. याशिवाय रोज अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएसदेखील यामध्ये देण्यात येत आहेत.

Advertisement

447 रुपयांचा प्लॅन :- या योजनेत आपल्याला 60 दिवसांसाठी एकूण 50 जीबी हाय स्पीड डेटा मिळेल. यानंतर आपण 64 केबीपीएसच्या वेगाने इंटरनेट वापरू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला दररोज अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतील.

597 रुपयांचा प्लॅन :- या योजनेत 75 जीबीचा हाई स्पीड डेटा उपलब्ध आहे, ज्याची वैधता 90 दिवस आहे. यानंतर आपण 64 केबीपीएसच्या वेगाने इंटरनेट वापरू शकता. याशिवाय दररोज अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएस उपलब्ध असतील.

Advertisement

2397 रुपयांचा प्लॅन :- या योजनेची वैधता एका वर्षासाठी अर्थात 365 दिवस आहे. यात एकूण 365 जीबी हाय स्पीड डेटा देण्यात आला आहे, त्यानंतर आपण 64 केबीपीएसच्या वेगाने इंटरनेट वापरू शकता. याशिवाय दररोज अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएस उपलब्ध आहेत.

या सर्व प्लॅन्समध्ये डेटा व कॉलिंग सुविधांव्यतिरिक्त तुम्हाला JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud चे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement