Bajaj Discover : 82 kmpl चे मायलेज देणारी बजाज डिस्कव्हर खरेदी करा 22 हजारांमध्ये; ऑफर काय आहे ते जाणून घ्या

MHLive24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- पेट्रोल-डिझेलच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्येक जण जास्त मायलेज देणाऱ्या गाड्यांकडे वळत आहे. त्यामुळे जास्त मायलेज देणाऱ्या बाइक्सना मोटरसायकल सेगमेंटमध्ये सर्वाधिक मागणी आहे.(Bajaj Discover)

आज आपण अशाच एका जास्त मायलेज देणारया बजाज डिस्कव्हर 125 बद्दल पाहणार आहोत जी त्यांच्या कंपनीची लोकप्रिय बाइक आहे. जर तुम्ही ही बाईक शोरूममधून खरेदी केली तर त्यासाठी तुम्हाला 51,793 रुपये ते 62,253 रुपये खर्च करावे लागतील.

पण जर तुम्हाला ही बाईक अर्ध्याहून कमी किमतीत खरेदी करायची असेल, तर तुम्ही 22 हजार रुपयांमध्ये खरेदी करता येईल अशा एका ऑफर बदल जाणून घेऊ शकता .

Advertisement

आजची ऑफर BIKES24 द्वारे बजाज डिस्कव्हर 125 वर दिली गेली आहे. BIKES24 ही सेकंड हँड बाईक विकणारी वेबसाइट आहे . त्याची किंमत साईटवर फक्त 22 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या बाईकचे मॉडेल 2014 चे आहे. या डिस्कव्हरने आत्तापर्यंत 11171 किलोमीटर पळाली आहे.

कंपनी या बाइकच्या खरेदीवर काही अटींसह 1 वर्षाची वॉरंटी आणि सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी योजना देत आहे. या मनी बॅक गॅरंटी प्लॅननुसार, जर तुम्ही ही बाईक विकत घेतली आणि तुम्हाला ती बाईक आवडत नसेल किंवा त्यात कोणताही दोष आढळला तर तुम्ही ती कंपनीला परत करू शकता.

या बाईकवर उपलब्ध ऑफर्स जाणून घेतल्यानंतर, आता तुम्हाला या बाईकचे मायलेज, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. बजाज डिस्कव्हर 125 मध्ये, कंपनीने सिंगल सिलेंडरसह 124 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे जे एअर कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित डीटीएसआय इंजिन आहे.

Advertisement

हे इंजिन 11 PS पॉवर आणि 11 Nm पीक टॉर्क जनरेट करते, जे 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की हा डिस्कव्हर 82.4 kmpl चा मायलेज देते.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker