Yamaha Fascino125 : फक्त 9 हजार देऊन खरेदी करा ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि Yamaha Fascino125; जाणून घ्या ऑफर…

MHLive24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- आजकाल बाईकची क्रेझ वाढायला लागली आहे. तरुणाई अक्षरशः बाइकवेडी आहे. याचमुळे आजची परिस्थिती लक्षात घेता कंपन्या दुचाकी क्षेत्रामध्ये मायलेज असलेल्या बजेट स्कूटर्सपासून ते हाय-टेक फीचर्स असलेली प्रीमियम स्कूटर्सपर्यंत मोठी रेंज आहे.( Yamaha Fascino125 )

ज्यामध्ये आज आपण Yamaha Fascino 125 स्कूटरबद्दल बोलत आहोत. जी एक आकर्षक डिझाईन केलेली स्कूटर आहे ज्यामध्ये जास्त मायलेजसह हाय-टेक फीचर्स देखील उपलब्ध आहेत.

जर तुम्हास ही स्कूटर खरेदी करायचीच असेल तर यासाठी तुम्हाला 73,503 रुपये ते 79,830 रुपये खर्च करावे लागतील, परंतु जर तुमच्याकडे इतके मोठे बजेट नसेल, तर आम्ही तुम्हाला ही स्कूटर अगदी कमी दरात घर पोहोच कशी होईल या प्लॅन बद्दल सांगणार आहोत.

Advertisement

BIKEDEKHO या टू-व्हीलर सेगमेंटबद्दल माहिती देणाऱ्या वेबसाइटवर दिलेल्या डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही या स्कूटरचे हायब्रिड डिस्क व्हेरिएंट खरेदी केले तर कंपनीशी संबंधित बँक त्यावर 84,501 रुपये कर्ज देईल.

या कर्जावर, तुम्हाला 9,389 रुपये किमान डाउन पेमेंट भरावे लागेल, त्यानंतर प्रत्येक महिन्याला 3,044 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. या स्कूटरसाठी कर्जाची मुदत 36 महिन्यांची ठेवण्यात आली आहे आणि बँक शुल्क आकारेल. या कर्जाच्या रकमेवर वार्षिक 9.7टक्के व्याज बँक आकारेल.

डाउन पेमेंटवर Yamaha Fascino 125 घेण्याची ऑफर जाणून घेतल्यानंतर, आता तुम्हाला या स्कूटरची वैशिष्ट्ये आणि तपशीलांची संपूर्ण माहिती माहित देनार आहोत.

Advertisement

Yamaha Fascino कंपनीने सहा प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे, ज्याच्या डिस्क ब्रेक व्हेरियंटमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीची सुविधा देण्यात आली आहे. या स्कूटरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, यात 125 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे फ्यूल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे.

हे इंजिन 8.2 PS ची पॉवर आणि 10.3 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते आणि या इंजिनसोबत ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. स्कूटरच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही Fascino स्कूटर 68.75 kmpl चा मायलेज देते.

महत्त्वाची माहिती: या Yamaha Fascino 125 Hybrid वर उपलब्ध कर्जाची रक्कम, डाउन पेमेंट आणि व्याजदर तुमच्या बँकिंग आणि CIBIL स्कोअरवर अवलंबून आहेत. तुमच्या बँकिंग किंवा CIBIL स्कोअरमध्ये नकारात्मक अहवाल आढळल्यास, बँक त्यानुसार कर्जाची रक्कम, डाउन पेमेंट आणि व्याजदरांमध्ये बदल करू शकते.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker