सरकारच्या आर्थिक मदतीवर उभा करा ‘हा’ व्यवसाय; महिन्याला लाखो रुपये कमावण्याची संधी

MHLive24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :- अळंबी ही एक बुरशी असून तिला मशरूम असेही म्हटले जाते. अळंबी हरितद्रव्यविरहित असून मुख्यत: निसर्गामध्ये पावसाळय़ात ती कुजणारा पालापाचोळा, माती, लाकडाचे ओंडके, झाडांचे खोड, मुळे, जनावरांची विष्ठा इत्यादी वाढताना आढळते. रुचकर आणि पौष्टिक अळंबीच्या १०-१२ प्रकारांची जगभरात व्यापारी तत्त्वावर लागवड केली जाते.(Business Plan)

बटन, ऑयस्टर, भाताच्या पेंढय़ावर वाढणारी आणि दुधी, अळंबी अशा अळंबीचे व्यापारी तत्त्वावर उत्पन्न घेतले जाते. अळंबीसाठी वापरण्यात येणारा पेंढा शेतातील भातकापणी झाल्यानंतर उपलब्ध होतो व अळंबीचे उत्पन्न घेतल्यानंतर उरलेला चोथा हा खत म्हणून पुन्हा शेतात वापरता येतो. यामुळेच अळंबी लागवड हा शेतीला पूरक व्यवसाय आहे.

मशरूम केवळ पौष्टिक आणि औषधी दृष्टिकोनातूनच नव्हे तर निर्यातीसाठी देखील महत्त्वाचे आहे. आतापर्यंत मशरुमच्या शेतीमधून अनेकांनी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. मशरूमला रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समध्ये मागणी असते.

Advertisement

कशी कराल मशरुमची शेती ?

 जर तुम्हाला या व्यवसायातून कमाई करायची असेल तर तुम्हाला मशरूम लागवडीच्या तंत्राकडे लक्ष द्यावे लागेल. प्रति चौरस मीटर 10 किलो मशरूमचे सहज उत्पादन घेता येते. किमान 40 × 30 फूट जागेत तीन-तीन फूट रुंद रॅक बनवून मशरूम वाढवता येतात.

तुम्ही सरकारी अनुदानाच्या मदतीने हा व्यवसाय सुरू करू शकता. बटन, ऑयस्टर, भाताच्या पेंढय़ावर वाढणारी आणि दुधी, अळंबी अशा अळंबीचे व्यापारी तत्त्वावर उत्पन्न घेतले जाते.

Advertisement

अळंबीसाठी वापरण्यात येणारा पेंढा शेतातील भातकापणी झाल्यानंतर उपलब्ध होतो व अळंबीचे उत्पन्न घेतल्यानंतर उरलेला चोथा हा खत म्हणून पुन्हा शेतात वापरता येतो. यामुळेच अळंबी लागवड हा शेतीला पूरक व्यवसाय आहे.

सर्व कृषी विद्यापीठे आणि कृषी संशोधन केंद्रांमध्ये मशरूम लागवडीचे प्रशिक्षण दिले जाते. जर तुम्ही त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याचा विचार करत असाल तर एकदा ते योग्यरित्या प्रशिक्षित करणे चांगले.

किती कमाई होईल ?

Advertisement

जर तुम्ही प्रगत तंत्रज्ञानाने त्याची सुरुवात केलीत तर तुम्हाला सुरुवातीपासूनच लाखोंची कमाई करा येईल. जर तुम्ही ते 100 चौरस फूट क्षेत्रामध्ये अळंबीची शेती सुरु केली तर वर्षाला तुम्हाला 1 लाख ते 5 लाख रुपयांचा नफा मिळेल.

‘या ठिकाणी’ एक लाख रुपये किलो दराने विकल्या जाणाऱया अळंबीचे उत्पादन

भारताची मशरुम सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱया सोलन येथील एका तरुण शेतकऱयाने एक लाख रुपये किलो दराने विकल्या जाणाऱया अळंबीचे उत्पादन घेण्यात यश संपादन केले आहे. अनेक प्रयोग आणि कठोर परिश्रम केल्यानंतर त्यांना हे साध्य झाले आहे. आपल्या खासगी प्रयोगशाळेत तीन वर्षांच्या प्रयत्नानंतर त्यांनी या अळंबीचे उत्पादन घेण्याचे तंत्रज्ञान शोधून काढले आहे.

Advertisement

या वैशिष्टय़पूर्ण अळंबीचे उत्पादन देशातील केवळ 100 शेतकरी घेत आहेत. संशोधक शेतकरी निशांत गाजटा यांचे वैशिष्टय़ असे, की त्यांनी या अळंबीचे खात्रीलायक उत्पादन घेण्याचे तंत्रज्ञान शोधले आहे.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker