Business: अवघ्या 10 वर्षाच्या मुलीने उभा केला ‘हा’ व्यवसाय ; महिन्यात कमावले 1 कोटी

MHLive24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- यश किंवा सफलता हे वयावर अवलंबून नसते. ते परिश्रम, मेहनत यावर अवलंबून असते. हे अगदी तंतोतंत खरे केले आहे एका 10 वर्षांच्या मुलीने. एका 10 वर्षांच्या मुलीचा स्वतःचा खेळण्यांचा व्यवसाय आहे. खेळण्यांच्या या व्यवसायातून ही मुलगी महिन्याला करोडो रुपये कमावते. ऐकून धक्का बसला ना? पण हे खरे आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर…(Business)

महिन्याची कमाई 1 कोटी 4 लाखांहून अधिक

ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. 10 वर्षांची मुलगी तिच्या खेळण्यांच्या व्यवसायातून एवढी कमाई करते की ती 15 व्या वर्षी आरामात रिटायरमेंट घेऊ शकते. पिक्सी कर्टिस नावाच्या या मुलीने आपल्या आईच्या मदतीने हा व्यवसाय सुरू केला. आश्चर्याची बाब म्हणजे एका महिन्यात पिक्सीने 1 कोटी 4 लाख रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

Advertisement

वयाच्या 10 व्या वर्षी व्यवसायाला सुरुवात केली

‘मिरर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, पिक्सी ही ऑस्ट्रेलियामधील रहिवासी आहे. ती तिच्या आईसोबत फिजेट्स आणि रंगीबेरंगी पॉपिंग खेळणी बनवते. या खेळण्यांची मागणी इतकी जास्त आहे की ते काही मिनिटांत विकले जातात.

एवढेच नाही तर या 10 वर्षांच्या मुलीच्या नावावर एक हेअर ऍक्सेसरी ब्रँड देखील आहे जो पिक्सीच्या आई रॉक्सीने स्वतः तयार केला आहे. यात अतिशय स्टाइलिश आणि सुंदर हेडबँड, क्लिप आणि बरेच काही आहे.

Advertisement

मुलीने स्वप्न साकार केले

रॉक्सीने एका मुलाखतीत सांगितले की, ‘माझ्यासाठी सर्वात रोमांचक भावना म्हणजे माझ्या मुलीने खूप लहान वयात घेतलेली मेहनत, पण ही प्रतिभा माझ्यामध्ये कधीच नव्हती. मलाही यशस्वी व्हायचे होते. पण माझ्या मुलीने इतक्या कमी वयात व्यवसाय यशस्वी करून माझे स्वप्न पूर्ण केले आहे.

वयाच्या 15 व्या वर्षी निवृत्ती घेऊ शकते

Advertisement

रॉक्सी म्हणाली, ‘आम्ही पिक्सीसाठी सर्व प्लॅनिंग अशा प्रकारे केले आहे की, जर तिला हवे असेल तर ती वयाच्या १५ व्या वर्षीच निवृत्ती घेऊ शकते.’ पिक्सी सध्या सिडनीतील एका प्राथमिक शाळेत शिकते आणि व्यवसायही सांभाळते. या लहान वयातही पिक्सी आणि त्याच्या भावाकडे एक कोटी ४० लाख रुपयांची मर्सिडीज कार आहे.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker